Home शासकीय मतदान पथक प्रशिक्षणामुळे शुक्रवारी शाळा सकाळी भरणार:जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे निर्देश

मतदान पथक प्रशिक्षणामुळे शुक्रवारी शाळा सकाळी भरणार:जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे निर्देश

11 second read
0
0
20

no images were found

मतदान पथक प्रशिक्षणामुळे शुक्रवारी शाळा सकाळी भरणार:जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे निर्देश

कोल्हापूर, : मा. राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व 12 पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 साठीचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून या निवडणुकीचे मतदान दिनांक 5 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे.

         निवडणूक प्रक्रियेसाठी मतदान केंद्रावर मतदान कर्तव्य बजावणाऱ्या मतदान पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकांमध्ये जिल्ह्यातील माध्यमिक व प्राथमिक शाळांमधील अधिकारी व कर्मचारी—मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी—यांचा समावेश आहे.

        नियुक्त करण्यात आलेल्या मतदान पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रथम प्रशिक्षण शुक्रवार, दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणामुळे त्या दिवशी संपूर्ण दिवस शाळा नियमितपणे भरविणे शक्य नसल्याने, शुक्रवार, 23 जानेवारी रोजी माध्यमिक व प्राथमिक शाळा सकाळी 7.30 ते 11.30 या वेळेतच भरवाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय
Comments are closed.

Check Also

बोगस उपचारांची पडताळणी करुन कारवाई करा – पोलीस उपधीक्षक तानाजी सावंत

बोगस उपचारांची पडताळणी करुन कारवाई करा – पोलीस उपधीक्षक तानाजी सावंत कोल्हापूर, : सा…