Home गुंतवणूक दावोस येथे अदाणी समूहाकडून महाराष्ट्रासाठी ६६ अब्ज डॉलर्सच्या गुंतवणूक प्रस्तावांची घोषणा

दावोस येथे अदाणी समूहाकडून महाराष्ट्रासाठी ६६ अब्ज डॉलर्सच्या गुंतवणूक प्रस्तावांची घोषणा

13 second read
0
0
21

no images were found

दावोस येथे अदाणी समूहाकडून महाराष्ट्रासाठी ६६ अब्ज डॉलर्सच्या गुंतवणूक प्रस्तावांची घोषणा

स्वित्झर्लंडमधील दावोस येथे आयोजित ५६व्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (डब्ल्यूईएफ) च्या वार्षिक बैठकीदरम्यान अदाणी समूहाने महाराष्ट्रासाठी ६६ अब्ज डॉलर्स (सुमारे ६ लाख कोटी रुपये) गुंतवणुकीची रूपरेषा मांडली. हा या वर्षी जागतिक व्यासपीठावर कोणत्याही राज्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या सर्वात मोठ्या गुंतवणूक प्रस्तावांपैकी एक मानला जात आहे. ही गुंतवणूक योजना महाराष्ट्र सरकारसोबत करण्यात आलेल्या विविध सामंजस्य करारांद्वारे (एमओयू) औपचारिक करण्यात आली आहे.

प्रस्तावित गुंतवणूकएव्हिएशनस्वच्छ ऊर्जाशहर पायाभूत सुविधाडिजिटल प्लॅटफॉर्म तसेच आधुनिक उत्पादन (मॅन्युफॅक्चरिंग)अशा विविध क्षेत्रांमध्ये केली जाणार आहे. ही गुंतवणूक पुढील दहा वर्षांत टप्प्याटप्प्याने करण्यात येणार असून, महाराष्ट्राला भारतातील सर्वात मजबूत अर्थव्यवस्था आणि जगातील प्रमुख प्रादेशिक अर्थव्यवस्थांमध्ये कायम ठेवण्याचा या गुंतवणुकीचा उद्देश आहे. या योजना एकात्मिक (इंटिग्रेटेड) पायाभूत सुविधा मॉडेलवर आधारित आहेत.

दावोस येथे माध्यमांशी संवाद साधताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले,
“महाराष्ट्र राज्य अशा दीर्घकालीन गुंतवणूकदारांचे स्वागत करते, जे राज्याच्या विकासात्मक प्राधान्यांशी सुसंगतपणे पुढे जाण्यास इच्छुक आहेत. सातत्यपूर्ण गुंतवणुकीमुळे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतात, कौशल्य विकासाला बळकटी मिळते आणि राज्यातील विकासाची गती कायम राहते.”

एमओयूवर प्रतिक्रिया देताना अदाणी एंटरप्रायझेस लिमिटेड (एईएल) चे संचालक प्रणव अदाणी यांनी सांगितले,“महाराष्ट्रातील अदाणी समूहाच्या गुंतवणुकीची आखणी दीर्घकालीन दृष्टीकोनातून करण्यात आली आहे. पुढील ७ ते १० वर्षांत आर्थिक विकास, ऊर्जा परिवर्तन (एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन) आणि डिजिटल विस्ताराला बळकटी देणारे, भविष्यासाठी सज्ज असे पायाभूत सुविधा प्लॅटफॉर्म उभारण्यावर या गुंतवणुकीचा भर आहे.”

महाराष्ट्राच्या या योजनेत शहरी परिवर्तन आणि नव्या पिढीच्या पायाभूत सुविधांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे. भारतातील सर्वात महत्त्वाकांक्षी शहरी पुनर्विकास योजनांपैकी एक असलेलीधारावी पुनर्विकास योजनाही व्यापक, समावेशक आणि शहर परिवर्तनाच्या (सिटी ट्रान्सफॉर्मेशन) मॉडेल म्हणून पाहिली जात आहे.तसेचनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (एनएमआयए)२५ डिसेंबर २०२५ पासून कार्यान्वित झाल्यानंतर नवी मुंबई एक नवे ग्रोथ हब म्हणून उदयास येत आहे. ग्रीनफील्ड आणि मल्टी-मॉडल एव्हिएशन हब म्हणून विकसित करण्यात आलेला हा प्रकल्पमुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर)जिथे सुमारे २.५ कोटी लोक राहतातलॉजिस्टिक्स, कमर्शियल आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्राला नवी गती देईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

या गुंतवणूक योजनेतग्रीन इंटीग्रेटेड डेटा सेंटर पार्कउभारण्याचाही प्रस्ताव समाविष्ट असून, त्यांची एकूण क्षमता सुमारे,००० मेगावॅटइतकी असेल. याशिवाय, विमानतळाजवळ एक विशेषइंटीग्रेटेड एरिनाआणिकमर्शियल क्षेत्रविकसित करण्याची योजनाही या गुंतवणुकीचा भाग आहे.या योजनेतस्वच्छ तसेच ट्रांझिशनल ऊर्जाक्षेत्रालाही विशेष महत्त्व देण्यात आले आहे. प्रस्तावित प्रकल्पांमध्ये एकूण,७०० मेगावॅट क्षमतेच्या पंप्ड स्टोरेज जलविद्युत प्रकल्पांकोळसा गॅसिफिकेशन उपक्रम, तसेच प्रस्तावितसेमीकंडक्टर आणि डिस्प्ले फॅब्रिकेशन सुविधासुरू करण्याचाही समावेश आहे.एकूण६६ अब्ज डॉलर्सचे हे गुंतवणूक पोर्टफोलिओ महाराष्ट्राला अदाणी समूहाच्या पुढील विकास टप्प्याच्या केंद्रस्थानी आणते. दावोस येथे जागतिक नेते स्थैर्य, शाश्वत विकास आणि स्पर्धात्मकतेवर चर्चा करत असताना, महाराष्ट्राबाबत अदाणी समूहाच्या या योजनेतून स्पष्ट संकेत मिळतो की भारताचा पायाभूत सुविधांवर आधारित विकास पुढेइंटीग्रेटेड प्लॅटफॉर्म्सदीर्घकालीन भांडवलआणि अशाभागीदाऱ्यांद्वारे आकार घेईल, ज्या प्रादेशिक विकासाला जागतिक संधींशी जोडतील.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In गुंतवणूक
Comments are closed.

Check Also

कोल्हापुरातील तरुणाईच्या उज्वल भविष्याचे स्वप्न साकार होणार- आमदार अमल महाडिक

कोल्हापुरातील तरुणाईच्या उज्वल भविष्याचे स्वप्न साकार होणार- आमदार अमल महाडिक कोल्हापूर : …