no images were found
अदाणी समूहाची एआय पायाभूत सुविधांमध्ये 100 अब्ज डॉलर्सची मोठी गुंतवणूक
जगातील सर्वात मोठ्या एकात्मिक ऊर्जा-गणना उपक्रमांपैकी एक असलेली ही थेट गुंतवणूक पुढील दशकात अतिरिक्त 150 अब्ज डॉलर्सची ‘इंटेलिजन्स इकोसिस्टम’ उभारण्यास गती देईल आणि एआय युगासाठी भारताची ऊर्जा आणि संगणकीय पायाभूत व्यवस्था मजबूत करण्यास मदत करेल.
अहमदाबाद,: अदाणी समूहाने आज जगातील सर्वात मोठ्या एकात्मिक ऊर्जा-कंप्युटिंग गुंतवणुकींपैकी एक अशी गुंतवणुक जाहीर केली आहे. 2035 पर्यंत नवीकरणीय ऊर्जेवर चालणारे, हायपरस्केल आणि एआय-सज्ज डेटा सेंटर्स उभारण्यासाठी 100 अब्ज अमेरिकन डॉलर्सची थेट गुंतवणूक केली जाणार आहे. या उपक्रमामुळे दीर्घकालीन सॉवरेन ऊर्जा व संगणकीय पायाभूत व्यवस्था उभी राहील आणि उदयोन्मुख ‘इंटेलिजन्स क्रांती’मध्ये भारताला जागतिक नेतृत्व मिळवण्यास मदत होईल.
या गुंतवणुकीमुळे 2035 पर्यंत सर्व्हर उत्पादन, प्रगत विद्युत पायाभूत सुविधा, सॉवरेन क्लाउड प्लॅटफॉर्म आणि संबंधित उद्योगांमध्ये अतिरिक्त 150 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक होण्याची अपेक्षा आहे. एकत्रितपणे, पुढील दशकात भारतात सुमारे 250 अब्ज अमेरिकन डॉलर्सचे एआय पायाभूत सुविधा इकोसिस्टम तयार होण्याचा अंदाज आहे.
अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी सांगितले, “जग सध्या अशा ‘इंटेलिजन्स क्रांती’च्या उंबरठ्यावर आहे, जी मागील कोणत्याही औद्योगिक क्रांतीपेक्षा अधिक प्रभावी आणि व्यापक आहे. ऊर्जा आणि संगणकीय क्षमता यांचा समतोल साधणारे देश पुढील दशकाची रूपरेषा ठरवतील. भारताकडे नेतृत्व करण्याची मोठी संधी आहे. अदाणी समूह डेटा सेंटर्स आणि ग्रीन एनर्जीच्या मजबूत पायावर पुढे जात, भारताच्या तांत्रिक स्वावलंबनावर लक्ष केंद्रित करत संपूर्ण पाच-स्तरीय एआय प्रणाली उभारत आहे. एआय युगात भारत केवळ ग्राहक राहणार नाही. आम्ही इंटेलिजन्सचे निर्माते, बिल्डर आणि निर्यातदार होऊ आणि अशा भविष्याचा भाग बनण्याचा आम्हाला अभिमान आहे.”
हा रोडमॅप अदाणी कनेक्सच्या विद्यमान 2 गीगावॅट राष्ट्रीय डेटा सेंटर क्षमतेवर आधारित असून, ती वाढवून 5 गीगावॅटपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. यामुळे भारत जागतिक एआय अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी येईल. या दृष्टीकोनाचा भाग म्हणून गुगलसोबत भागीदारी करून विशाखापट्टणममध्ये देशातील सर्वात मोठा गीगावॅट-स्तरीय एआय डेटा सेंटर कॅम्पस उभारला जाणार आहे. तसेच नोएडा येथे आणखी एक कॅम्पस उभारला जाईल. मायक्रोसॉफ्ट सोबत हैदराबाद आणि पुणे येथे प्रकल्प राबवले जातील. याशिवाय, भारतभर मोठ्या प्रमाणावर कॅम्पस उभारण्यासाठी इतर मोठ्या कंपन्यांशीही चर्चा सुरू आहे. यामुळे अदाणी समूह भारतातील अग्रगण्य एआय पायाभूत सुविधा भागीदार म्हणून आपले स्थान अधिक मजबूत करत आहे.
या दृष्टीकोनानुसार, अदाणी समूह फ्लिपकार्टसोबतची आपली डेटा सेंटर भागीदारी आणखी मजबूत करणार आहे. या सहकार्याअंतर्गत फ्लिपकार्टच्या पुढील पिढीतील डिजिटल व्यापार, उच्च क्षमतेचे संगणन आणि मोठ्या प्रमाणातील एआय कामकाजासाठी खास तयार केलेले दुसरे एआय डेटा सेंटर विकसित केले जाणार आहे.