Home उद्योग अदाणी पोर्ट्स अँड सेझ आणि पोर्ट ऑफ मार्सेईल फॉस यांच्यात भारत–युरोप व्यापार संपर्क बळकट करण्यासाठी धोरणात्मक आयएमईसी भागीदारी

अदाणी पोर्ट्स अँड सेझ आणि पोर्ट ऑफ मार्सेईल फॉस यांच्यात भारत–युरोप व्यापार संपर्क बळकट करण्यासाठी धोरणात्मक आयएमईसी भागीदारी

12 second read
0
0
16

no images were found

अदाणी पोर्ट्स अँड सेझ आणि पोर्ट ऑफ मार्सेईल फॉस यांच्यात भारत–युरोप व्यापार संपर्क बळकट करण्यासाठी धोरणात्मक आयएमईसी भागीदारी

अहमदाबाद, : जगातील सर्वात वेगाने वाढणारी एकात्मिक वाहतूक उपयुक्तता असलेली अदाणी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड (एपीएसईझेड) आणि फ्रान्समधील अग्रगण्य बंदर तसेच भूमध्य समुद्राचे प्रमुख प्रवेशद्वार असलेल्या पोर्ट ऑफ मार्सेईल फॉस यांनी व्यापार सुलभता, बंदर नवोपक्रम आणि ऊर्जा संक्रमण क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी सामंजस्य करार (एमओयू) केला आहे.

या भागीदारीअंतर्गत इंडिया-मिडिल ईस्ट-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर (आयएमईसी) मार्गावरील महत्त्वाच्या बंदरांमध्ये समन्वय वाढवण्यासाठी ‘आयएमईसी पोर्ट्स क्लब’ स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे, ज्यामुळे भारत आणि युरोपियन युनियनमधील संपर्क अधिक बळकट होईल. भारत–ईयू मुक्त व्यापार करारामुळे भारत–ईयू व्यापाराला मोठी चालना मिळाली असून, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कराराला ‘सर्व करारांची जननी’ असे संबोधले आहे.

हा एमओयू फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या भेटीदरम्यान स्वाक्षरीत करण्यात आला, ज्यामुळे भारत–फ्रान्स धोरणात्मक भागीदारीला अधिक बळ मिळाले असून ती व्यापक आयएमईसी आणि भारत–ईयू व्यापार दृष्टिकोनाशी सुसंगत आहे. जी20 समिट, नवी दिल्ली येथे 2023 मध्ये सुरू करण्यात आलेला आयएमईसी हा 6,000 किमी लांबीचा बहुपद्धती संपर्क उपक्रम असून, सागरी मार्ग, रेल्वे नेटवर्क, डिजिटल प्रणाली आणि स्वच्छ ऊर्जा मार्गांच्या माध्यमातून भारत आणि युरोपला जोडतो.

आयएमईसी च्या पूर्वेकडील प्रवेशद्वारावर एपीएसईझेडची मुंद्रा आणि हजीरा येथील बंदरे दक्षिण आशियाला पश्चिम आशियाशी जोडणारे बहुपद्धती लॉजिस्टिक्स हब म्हणून कार्य करतात. या एमओयू द्वारे मार्सेईल फॉस हे कॉरिडॉरचे पश्चिम युरोपियन प्रवेशद्वार अधिक मजबूत करत असून सुमारे 70 दशलक्ष टन क्षमतेची भर घालत आयएमईसी चा विस्तार युरोपमध्ये अधिक खोलवर करत आहे.

मार्सेईल फॉस हे युरोपमधील सर्वात मोठ्या एकात्मिक बहुपद्धती बंदर परिसंस्थांपैकी एक आहे. ही भागीदारी भारत– ईयू व्यापार प्रवाह सुलभ करण्यासाठी अधिक संरचित आणि समन्वित मार्ग निर्माण करते.

या भागीदारीचा भर आयएमईसी मार्गाला युरेशियन व्यापार प्रवाहासाठी शाश्वत, सुरक्षित आणि स्पर्धात्मक पर्याय म्हणून प्रोत्साहन देण्यावर असेल. यामध्ये संयुक्त प्रचार मोहीम, आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावे व रोडशोमध्ये सहभाग तसेच लक्षित बी2बी संवादांचा समावेश असेल. तसेच बंदर डिजिटलायझेशन, स्मार्ट पोर्ट प्लॅटफॉर्म, डेटा इंटरऑपरेबिलिटी, सायबर सुरक्षा, पर्यायी इंधन, शोर पॉवर सप्लाय आणि कमी-कार्बन बंकरिंग या क्षेत्रांमध्ये तांत्रिक देवाणघेवाण आणि क्षमता विकास केला जाईल. मुंद्रा–मार्सेईल फॉस ग्रीन मॅरिटाइम कॉरिडॉर विकसित करणे तसेच आयएमईसी पायाभूत सुविधांसाठी धोरणात्मक चर्चा आणि गुंतवणूक आराखड्यांसाठी समन्वय साधण्यासाठी आयएमईसी पोर्ट्स क्लब ची सह-स्थापना केली जाईल.

एपीएसईझेडचे पूर्णवेळ संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अश्वनी गुप्ता म्हणाले, “या कॉरिडॉरच्या प्रगतीत भारताने आधीच नेतृत्वाची भूमिका घेतली आहे आणि भारत–ईयू मुक्त व्यापार कराराच्या निष्कर्षानंतर सहभागी देशांमधील व्यापारात मोठी वाढ अपेक्षित आहे. हजीरा आणि मुंद्रा येथील आमच्या बंदरांनी कॉरिडॉरच्या पहिल्या आणि मधल्या टप्प्यांमध्ये अखंड मार्ग निर्माण केला आहे. मार्सेईल फॉस सोबतच्या या एमओयू मुळे आम्ही युरोपपर्यंतचा अंतिम टप्पा यशस्वीरीत्या जोडला आहे. ही भागीदारी सहभागी देशांमधील माहिती आणि वस्तूंची देवाणघेवाण अधिक वेगवान करून आर्थिक सहकार्य आणि पुरवठा साखळीची लवचिकता अधिक बळकट करेल.”

मार्सेईल फॉस चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. हर्वे मार्टेल म्हणाले, “आयएमईसी कॉरिडॉर निर्णायक टप्प्यात प्रवेश करत असताना एपीएसईझेडसोबतची भागीदारी अधिक दृढ करताना आम्हाला आनंद होत आहे. भारत आणि मार्सेईल हे या भविष्यातील व्यापार कण्याच्या दोन टोकांवर उभे आहेत, ज्यामुळे या नव्या मार्गाची रचना आणि गती देण्याची मोठी जबाबदारी दोन्ही बंदरांवर आहे. आम्ही संबंधित बंदरांना एकत्र आणून अधिक कार्यक्षम, लवचिक आणि शाश्वत संपर्कासाठी ठोस पावले उचलण्याचा निर्धार केला आहे.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In उद्योग
Comments are closed.

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…