Home Uncategorized शिवाजी विद्यापीठात ‘संगीत वाद्यांची दुरुस्ती व मूलभूत देखभाल’ कार्यशाळेचे यशस्वी आयोजन

शिवाजी विद्यापीठात ‘संगीत वाद्यांची दुरुस्ती व मूलभूत देखभाल’ कार्यशाळेचे यशस्वी आयोजन

0 second read
0
0
5

no images were found

शिवाजी विद्यापीठात ‘संगीत वाद्यांची दुरुस्ती व मूलभूत देखभाल’ कार्यशाळेचे यशस्वी आयोजन
कोल्हापूर, : शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग आणि ‘कल्चरल क्लब’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय ‘संगीत वाद्यांची दुरुस्ती व मूलभूत देखभाल’ ही प्रात्यक्षिक कार्यशाळा नुकतीच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. २ आणि ३ नोव्हेंबर २०२६ रोजी अधिविभागाच्या छोट्या सभागृहात या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेसाठी पुण्यातील ज्येष्ठ वाद्यनिर्माते आणि वाद्यदुरुस्ती क्षेत्रातील प्रसिद्ध तज्ज्ञ श्री. हेमकांत नावडीकर यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तानपुरा, तबला आणि हार्मोनिअम यांसारख्या विविध भारतीय शास्त्रीय वाद्यांची दुरुस्ती, त्यांची देखभाल, जवारी काढणे , तबला ओढ काढणे, हार्मोनिअम ट्यूनिंग करणे याविषयीचे सखोल प्रात्यक्षिक श्री. नवडीकर यांनी विद्यार्थ्यांना दिले. यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, “संगीत क्षेत्रात वादन व गायनाइतकेच वाद्यांची निगा राखणे आणि त्यांची दुरुस्ती समजणे हेही कलाकारासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना केवळ तात्विक ज्ञान न मिळता प्रत्यक्ष वाद्य दुरुस्तीचे कौशल्याधारित शिक्षण मिळाले पाहिजे.” श्री. नावडीकर यांनी विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीतातील रागांचे ज्ञान खेळातून व्हावे या दृष्टिकोनातून तयार केलेल्या ‘सूर ताश’ या पत्त्यांच्या खेळाचेही यावेळी आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सर्व उपस्थित विद्यार्थ्यानी सहभाग घेतला.
या दोन दिवसीय कार्यशाळेला अधिविभागातील विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापकांची उपस्थिती लाभली. कार्यशाळेचे प्रास्ताविक अधिविभाग प्रमुख डॉ. विनोद ठाकूरदेसाई यांनी केले. तर आभार सौ. देशपांडे यांनी मानले. कार्यक्रमाचे संयोजन प्रशांत देसाई व गिरीधर कुलकर्णी यांनी केले.
Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

शिक्षकांच्या हक्कांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार कौस्तुभ गावडे यांचा ठाम पाठपुरावा!

शिक्षकांच्या हक्कांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार कौस्तुभ गावडे यांचा ठ…