
no images were found
अनयाज चेस क्लब आयोजित शालेय मुलांच्या शास्त्रीय बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात सुरू…शौर्य अर्णव अरिना,अंशुमन,शंतनू व महिमा आघाडीवर
कोल्हापूर :- कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने अनयाज चेस क्लब ने आयोजित केलेल्या नऊ,बारा व पंधरा वर्षाखालील शालेय मुलांच्या बुद्धिबळ स्पर्धा आज उत्साहात सुरू झाल्या.या स्पर्धेचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष राहुल चिकोडे व युवा उद्योजक मनीष झंवर यांचे हस्ते बुद्धिबळाच्या पटावर चाल करून करण्यात आले. शालेय मुलांच्या बुद्धिबळातील प्रगतीसाठी शास्त्रीय बुद्धिबळ स्पर्धा नियमीतपणे होणे आवश्यक आहे, त्यासाठी आवश्यक ते सहकार्य व मदत करण्याचा प्रयत्न करीन असे राहुल चिकोडे यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक अरुण मराठे, एडवोकेट प्रिया पवार, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव व आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले,धीरज वैद्य,प्रशिक्षक उत्कर्ष लोमटे व स्पर्धा संयोजक मनीष मारुलकर हे व्यासपीठावर उपस्थित होते.
नऊ,बारा व पंधरा वर्षाखालील मुलांच्या गटात होणाऱ्या या स्पर्धा स्विस लीग पद्धतीने एकूण सहा फेऱ्यात होणार आहेत.तिन्ही गटात मिळून एकूण विक्रमी ९० बुद्धिबळपटू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.
आज झालेल्या तिसऱ्या फेरीनंतर नऊ वर्षाखालील मुलांच्या गटात अग्रमानांकित शौर्य बगाडिया, द्वितीय मानांकित अर्णव पाटील,आदित्य ठाकूर व रौनक झंवर हे चौघेजण तीन गुणासह संयुक्तपणे आघाडीवर आहेत.वेदांत बांगड, आदित्य घाटे, अथर्वराज ढोले, सांची चौधरी, सरथा त्रप्ती, दिविजा माने, श्रीहरी रानडे, दिविज काथ्रूट, शौर्य पाटील,रुद्र मडिलगे, आदित्य कत्तीमनी हे अकरा जण दोन गुणासह संयुक्तपणे द्वितीय स्थानावर आहेत.बारा वर्षाखालील मुलांच्या गटात, अग्रमानांकित अरिना मोदी व अंशुमन शेवडे तीन गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर आहे तर सर्वेश पोतदार, अर्णव रहाटवळ व सिद्धार्थ चौगुले हे तिघेजण अडीच गुणासह संयुक्तपणे द्वितीय स्थानावर आहेत.राजदीप पाटील, प्रेम निचल, अथर्व तावरे मनवीत कांबळे, अंशुल चुयेकर, सिद्धी कर्वे,आरुश ठोंबरे, अमन नायकवडी व प्रणव साळुंखे हे नऊ जण दोन गुणासह संयुक्तपणे तृतीय स्थानावर आहेत.पंधरा वर्षाखालील मुलांच्या गटात अग्रमानांकित शंतनू पाटील, व्यंकटेश खाडे पाटील,महिमा शिर्के व अरीन कुलकर्णी हे चौघेजण तीन गुणांसाठी संयुक्तपणे आघाडीवर आहेत. आरव पाटील,नारायण पाटील, हित बलदवा, अपूर्व ठाकूर आर्यन पाटील सतेज पाटील, प्रेम पाटील प्रणव मोरे व शरयु साळुंखे हे नऊजण दोन गुणासह संयुक्तपणे द्वितीय स्थानावर आहेत.