Home राजकीय अग्निपथ योजनेअंतर्गत भरती झालेले तरुण मधूनच ट्रेनिंग सोडून जाणाऱ्यांकडून ट्रेनिंग शुल्क आकारणार

अग्निपथ योजनेअंतर्गत भरती झालेले तरुण मधूनच ट्रेनिंग सोडून जाणाऱ्यांकडून ट्रेनिंग शुल्क आकारणार

0 second read
0
0
62

no images were found

अग्निपथ योजनेअंतर्गत भरती झालेले तरुण मधूनच ट्रेनिंग सोडून जाणाऱ्यांकडून ट्रेनिंग शुल्क आकारणार

दिल्ली :- अग्निपथ योजनेअंतर्गत पहिल्या बॅचमधून 50 पेक्षा अधिक तरुणांनी ट्रेनिंग मधूनच सोडली आहे, तर दुसऱ्या बॅचमध्येही काहीशी अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे आता मधूनच ट्रेनिंग सोडून जाणाऱ्यांकडून ट्रेनिंग शुल्क आकारण्याचा विचार सुरू असल्याचे एका खाजगी वृत्तवाहिनीने सांगितला आहे.यामुळे जे भारतीय लष्करात भरती होण्यासाठी खरोखरच इच्छुक आहेत,अशाच तरुणांवर लक्ष देता येणार आहे.

अग्निपथ योजनेअंतर्गत पहिल्या बॅचची ट्रेनिंग संपली असून दुसऱ्या बॅचची ट्रेनिंग सुरू झाली आहे. पुढील महिन्यात पहिली तुकडी भारतीय लष्करात दाखल होणार आहे. मात्र, प्रशिक्षणादरम्यानच अनेक तरुण मधूनच ट्रेनिंग सोडून गेले आहेत. विविध कारणं देऊन ट्रेनिंग मधेच सोडणाऱ्या तरुणांवर कारवाई केली जाऊ शकते. तरुणांच्या प्रशिक्षणासाठी खर्च झालेली रक्कमही त्यांच्याकडून वसूल केली जाणार आहे.

अधिकाऱ्यांनी हे देखील सांगितलं की, मधूनच ट्रेनिंग सोडणाऱ्या तरुणांकडून विविध कारणं देण्यात येतात. काही जणांनी 30 दिवस किंवा त्याहून अधिक मेडिकल लिव्ह घेतली आणि ट्रेनिंगमधून बाहेर पडले. काहींनी चांगली संधी मिळाल्याचं सांगून ट्रेनिंग मधेच सोडली. सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे सैन्यात असा नियम आहे की,जर कोणी 30 दिवसांपेक्षा जास्त दिवस ट्रेनिंगला गैरहजर राहिला तर त्याला बाहेरचा रस्ता दाखवला जातो.

लष्कराच्या ट्रेनिंगमध्ये मधूनच बाहेर पडायचं असल्यास काही नियम नाहीत, पण सध्याची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकार आता नवे नियम बनवण्याच्या तयारीत आहे. खाजगी वृत्तवाहिनीच्या एका रिपोर्टनुसार, मधूनच ट्रेनिंग सोडून जाणाऱ्या तरुणांकडून आता ट्रेनिंग शुल्क आकारण्यात येणार आहेत.

सहा महिन्यांच्या ट्रेनिंगनंतर अग्निवीरांना विविध युनिट्समध्ये तैनात केलं जाणार आहे आणि 4 वर्षांनंतर यातील 25 सैनिकांना परमनंट केलं जाणार आहे. तसं पाहिलं तर भारतीय लष्कर 50 युवकांनी परमनंट करु इच्छिते, त्यासाठी भारतीय लष्कराने केंद्रासमोर प्रस्ताव देखील मांडला आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

विद्यापीठात ‘जीएसटी’च्या अनुषंगाने २३ मार्चपासून राष्ट्रीय चर्चासत्र

विद्यापीठात ‘जीएसटी’च्या अनुषंगाने २३ मार्चपासून राष्ट्रीय चर्चासत्र कोल्हापूर,(प्रति…