Home स्पोर्ट्स इचलकरंजीमध्ये केन चेस अकॅडमी आयोजित पहिल्या खुल्या सांघिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत विक्रमी ५६ संघामधील २२४ बुद्धिबळपटू  सहभागी; 

इचलकरंजीमध्ये केन चेस अकॅडमी आयोजित पहिल्या खुल्या सांघिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत विक्रमी ५६ संघामधील २२४ बुद्धिबळपटू  सहभागी; 

56 second read
0
0
132

no images were found

इचलकरंजीमध्ये केन चेस अकॅडमी आयोजित पहिल्या खुल्या सांघिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत विक्रमी ५६ संघामधील २२४ बुद्धिबळपटू  सहभागी; 

 

 इचलकरंजी (प्रतिनिधी) :- चेस असोसिएशन कोल्हापूरच्या मान्यतेने केन इंडिया फाउंडेशन व केन चेस अकॅडमी,इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने व श्री स्वकुल साळी समाजाच्या सहकार्याने पहिल्यांदाच इचलकरंजी मध्ये आयोजित केलेल्या केन खुल्या सांघिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा आज मोठा दिमाखात प्रारंभ झाल्या.

 श्री.स्वकुल साळी समाज  सांस्कृतिक हॉल,  इचलकरंजी येथे आयोजित केलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन केन इंडिया फाउंडेशनचे  उद्योजक निकुंज बगडिया, व श्री.स्वकुल साळी समाज,इचलकरंजी चे अध्यक्ष रमेश कनोजे यांच्या हस्त बुद्धिबळाच्या पटावर चालू करून करण्यात आले.                                             इचलकरंजी मध्ये पहिल्यांदाच होत असलेल्या सांघिक बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूर सांगली सातारा जयसिंगपूर व स्थानिक इचलकरंजी येथील  विक्रमी 56 संघाचे प्रत्येकी चार याप्रमाणे 224 बुद्धिबळपटू सहभागी झाले आहेत.                                ही स्पर्धा स्विस लिग पद्धतीने एकूण सात फेऱ्यात होणार आहे.आज झालेल्या तिसऱ्या फेरीअखेर अग्रमानांकित  अनाकोंडा टीम, द्वितीय मानांकित कोल्हापूर वॉरियर्स, तृतीय मानांकित चेस वॉरियर्स, नववे मानांकित चेकमेट वॉरियर्स व केन मेट मेकर्स  हे पाच संघ सहा गुणासह संयुक्तपणे आघाडीवर आहेत.

  स्पर्धेसाठी पहिल्या सात संघांना रोख बक्षिसे व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त उत्कृष्ट महिला संघ,उत्कृष्ट शालेय संघ व उत्कृष्ट बोर्ड प्राईस अशी उत्तेजनार्थ बक्षीसे दिली जाणार आहेत.                                                                   या सांघिक स्पर्धेसाठी वरिष्ठ राष्ट्रीय पंच करण परीट हे मुख्य पंच म्हणून काम पाहत आहेत त्यांना दीपक वायचळ,रोहित पोळ ,मोहिनीराज डांगे, विजय सलगर व श्रुती कुलकर्णी सहाय्यक पंच म्हणून सहकार्य करत आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

कोल्हापुरातील तरुणाईच्या उज्वल भविष्याचे स्वप्न साकार होणार- आमदार अमल महाडिक

कोल्हापुरातील तरुणाईच्या उज्वल भविष्याचे स्वप्न साकार होणार- आमदार अमल महाडिक कोल्हापूर : …