no images were found
अदाणी पोर्ट्स टीएनएफडीचे सदस्य बनले, निसर्ग-आधारित अहवाल सादर करण्याचा संकल्प
· एपीएसईझेड ने निसर्गाशी संबंधित वित्तीय प्रकटीकरण कार्यबल (Taskforce on Nature-related Financial Disclosures – TNFD) मध्ये अॅडॉप्टर म्हणून सामील होत, टीएनएफडीच्या शिफारसींनुसार निसर्गाशी संबंधित अवलंबन, परिणाम, जोखमी आणि संधी यांचा विचार करण्याची बांधिलकी दर्शवली आहे.
· भारताची पहिली इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट युटिलिटी म्हणून टीएनएफडी फ्रेमवर्क स्वीकारून, एपीएसईझेडने निसर्ग-पॉझिटिव्ह पायाभूत विकासासाठी नवा मापदंड प्रस्थापित केला आहे.
· जैवविविधतेचे संवर्धन करणाऱ्या जागतिक बंदर ऑपरेटरांच्या निवडक गटात सामील होत,एपीएसईझेडने सागरी परिसंस्थेचे संरक्षण करण्याच्या वचनबद्धतेस अधिक बळकटी दिली आहे.
· टीएनएफडी-अनुरूप अहवाल आर्थिक वर्ष 2026 पासून सुरु केले जातील.
अहमदाबाद,: भारतातील सर्वात मोठी इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट युटिलिटी असलेले अदाणी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड (APSEZ),निसर्गाशी संबंधित वित्तीय प्रकटीकरण कार्यबल (टीएनएफडी) मध्ये अॅडॉप्टर म्हणून सामील झाली आहे.या माध्यमातून कंपनीने निसर्गाशी संबंधित अवलंबन,परिणाम, जोखमी आणि संधींवर आधारित टीएनएफडी-अनुरूप अहवाल प्रणाली राबविण्याचे वचन दिले आहे. यामुळे एपीएसईझेड ही टीएनएफडी फ्रेमवर्क स्वीकारणारी भारतातील पहिली इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट युटिलिटी ठरली असून, निसर्ग-पॉझिटिव्ह पायाभूत विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
टीएनएफडी (TNFD) ही एक जागतिक, विज्ञानाधारित पुढाकार योजना आहे, जी युनायटेड नेशन्स एन्व्हायर्नमेंट प्रोग्रॅम फायनान्स इनिशिएटिव्ह (UNEP FI),युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम (UNDP), वर्ल्ड वाइल्डलाइफ फंड (WWF) आणि ग्लोबल कॅनोपी यांच्या संयुक्त सहकार्याने स्थापन झाली आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट कंपन्यांना निसर्गाशी संबंधित जोखमी व संधी ओळखणे, त्यांचे मूल्यमापन करणे, व्यवस्थापन करणे आणि प्रकटीकरण करणे यासाठी मार्गदर्शन करणे आहे.
या जागतिक उपक्रमात सामील होऊन एपीएसईझेड आता जैवविविधतेचे संवर्धन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय बंदर ऑपरेटरांच्या निवडक गटाचा भाग बनली आहे. कंपनीने विज्ञानाधारित आणि पारदर्शक पर्यावरणीय अहवाल प्रणालीद्वारे सागरी परिसंस्थांचे संरक्षण करण्याची आपली वचनबद्धता अधिक दृढ केली आहे, ज्यामुळे ती शाश्वत सागरी लॉजिस्टिक्स क्षेत्रातील अग्रणी ठरली आहे.
या वचनबद्धतेचा एक भाग म्हणून, एपीएसईझेड आर्थिक वर्ष 2026 पासून आपल्या कॉर्पोरेट अहवालांमध्ये टीएनएफडीच्या शिफारसींशी सुसंगत प्रकटीकरण मानकांचा अवलंब करेल. ही पुढाकार कंपनीच्या व्यापक ईएसजी (Environmental, Social and Governance) धोरणाचा एक महत्त्वाचा घटक आहे आणि निसर्गाशी संबंधित अवलंबन, परिणाम, जोखमी आणि संधी यांचे मूल्यांकन आणि व्यवस्थापन करण्याच्या तिच्या सक्रिय दृष्टिकोनाचे प्रतिबिंब आहे.
एपीएसईझेडने आधीच जागतिक मान्यतेच्या फ्रेमवर्कशी सुसंगत हवामान जोखीम मूल्यांकन आणि प्रकटीकरण प्रणाली राबवली आहे. कंपनीने 4,200 हेक्टरहून अधिक मॅन्ग्रोव्ह वृक्षारोपण केले असून अतिरिक्त 3,000 हेक्टर मॅन्ग्रोव्ह क्षेत्राचे संरक्षण सक्रियपणे केले जात आहे. त्यामुळे एपीएसईझेड भारतामध्ये मॅन्ग्रोव्ह परिसंस्था पुनर्स्थापनेसाठी योगदान देणारी सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील संस्था ठरली आहे. हे प्रयत्न केवळ जैवविविधता वाढवतातच नाहीत, तर हवामानाशी संबंधित जोखमींच्या विरोधात नैसर्गिक संरक्षण कवच म्हणून कार्य करतात आणि कंपनीच्या दीर्घकालीन व्यवसायिक टिकाऊपणास बळकटी देतात.
अश्विनी गुप्ता, संपूर्णवेळ संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, एपीएसईझेड म्हणाल्या की,“आम्हाला ठाम विश्वास आहे की जबाबदार व्यावसायिक पद्धती दीर्घकालीन यशाला चालना देतात. टीएनएफडी फ्रेमवर्कचा स्वीकार करून आम्ही सीओपी30 दरम्यान निसर्गाशी संबंधित कॉर्पोरेट अहवाल देण्यास पाठिंबा दर्शवला आहे. आम्ही निसर्गाशी संबंधित मुद्द्यांना धोरणात्मक जोखीम व्यवस्थापनाच्या प्राधान्य म्हणून पाहतो. टीएनएफडी फ्रेमवर्क आमच्या निर्णयप्रक्रियेत निसर्गाचा समावेश करण्यासाठी आणि जैवविविधता संवर्धनातील आमच्या योगदानास बळकटी देण्यासाठी सक्षम पाठबळ पुरवतो,”