Home कौटुंबिक नैसर्गिक न्यू कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये वन्यजीव सप्ताह शुभारंभ       

न्यू कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये वन्यजीव सप्ताह शुभारंभ       

56 second read
0
0
74

no images were found

न्यू कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये वन्यजीव सप्ताह शुभारंभ                                                                                                     कोल्हापूर (प्रतिनिधी):महाराष्ट्र शासनाच्या वनविभाग आणि वन्यजीव विभाग, कोल्हापूर विभागाच्या वतीने कोल्हापूर येथील न्यू कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये वन्यजीव सप्ताह शुभारंभ कार्यक्रम संपन्न झाला. पृथ्वीवर प्रचंड जैवविविधता आहे, परंतु जंगलतोड, वाढते शहरीकरण, पशुपक्षांच्या अधिवासांवर मानवी अतिक्रमण यासारख्या बाबींमुळे हल्ली माणसाचा वन्याप्रण्यासोबत काही सम्मंध च येत नाही. ही परिस्तिथी बदलण्यासाठी हा छोटासा प्रयत्न करत आहोत.

कार्यक्रमासाठी अध्यक्ष मा. श्री. बी. जी. बोराडे, प्रमुख पाहुणे, तसेच मा. श्री. के. जी. पाटील, चेरमन, श्री. प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाउस,

    तसेच प्रमुख उपस्थिती मा. आमदार श्री अमल महाडिक विधानसभा सदस्य, कोल्हापूर (दक्षिण ) मा. श्री जी. गुरुप्रसाद  मुख्य वनरक्षक, कोल्हापूर. मा. श्री अमोल येडगे, जिल्हाधिकारी, मा. श्री योगेशकुमार गुप्ता, जिल्हा पोलीस अधीक्षक, कोल्हापूर मा. श्री धैर्यशील पाटील,मा. श्री तुषार चव्हाण, मा. श्री संजय वाघमोडे, प्राचार्य डॉ. सचिन पिशवीकर, प्राचार्य डॉ. संजय दाभोळे, इतर सर्व मान्यवर उपस्थित होते.

      या कार्यक्रमाचे उदघाट्न मा. आमदार श्री अमल महाडिक विधानसभा सदस्य, कोल्हापूर (दक्षिण ) यांनी केले. यामध्ये बोलताना वन्यजीवसाठी जिल्हास्तरीय दवाखाने उभा  राहतील त्यांच्या आरोग्यासाठी प्रशासन तप्तर राहील. तसेच यादिवशी जनजागृतीपर कार्यक्रम म्हणजे जनजागृती फेरी, स्वच्छता हीच सेवा, आणि विद्यार्थ्यासाठी उपकरन सादरीकरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

       या कार्यक्रमासाठी  राष्ट्रीय सेवा योजनेचे  विद्यार्थी व विद्यार्थिनी, प्राध्यापिका आणि प्राध्यापक उपस्थित होते.या कार्यक्रमामधून जनसेवेसोबत वन्यजीव सेवा पण कशी महत्वाची आहे याची माहिती मिळाली. या कार्यक्रमाचे संयोजन न्यू कॉलेज ऑफ फार्मसी आणि कार्यक्रम यशस्वीरित्या पर पाडण्यासाठी प्रा. प्रियांका गायकवाड यांनी आयोजन केले.

            

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In नैसर्गिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच चेहरा प्…