Home उद्योग टीव्हीएस मोटरने महाराष्ट्रात टीव्हीएस ऑर्बिटर सादर केली: नवीन भारतातील स्मार्ट, दीर्घकालीन, शहरी ईव्ही प्रवास

टीव्हीएस मोटरने महाराष्ट्रात टीव्हीएस ऑर्बिटर सादर केली: नवीन भारतातील स्मार्ट, दीर्घकालीन, शहरी ईव्ही प्रवास

44 second read
0
0
36

no images were found

टीव्हीएस मोटरने महाराष्ट्रात टीव्हीएस ऑर्बिटर सादर केली: नवीन भारतातील स्मार्टदीर्घकालीनशहरी ईव्ही प्रवास

     *या सेगमेंटमध्ये प्रथमच देण्यात आलेल्या 158 किमी आयडीसी रेंजक्रूझ कंट्रोलहिल होल्ड असिस्टप्रशस्त 34-लिटर बूटस्पेस आणि अनेक कनेक्टेड फीचर्स

     *स्थिरता आणि आरामदायी राइडसाठी उद्योगातील पहिलेच १४” फ्रंट व्हील

  • आधुनिकआकर्षक आणि उद्देशपूर्ण डिझाइनसह सुधारित एअरोडायनॅमिक कार्यक्षमतेसह.
  • सरळ रेषेतील फूटबोर्ड आणि लांब प्लॅटफॉर्म सीटसह योग्य आराम आणि उत्तम वापर.
  • आकर्षक लाँच किंमत ₹94,900 (एक्स-शोरूम मुंबईपीएम ई-ड्राइव्ह स्कीमसह)

 कोल्हापुर ,: दुचाकी आणि तीन चाकी वाहनांमधील जागतिक स्तरावरील आघाडीची कंपनी असलेल्या टीव्हीएस मोटर कंपनीने (टीव्हीएसएम) महाराष्ट्रात त्यांची नवीन इलेक्ट्रिक दुचाकी – टीव्हीएस ऑर्बिटर लाँच करण्याची घोषणा केली. रोजचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून डिझाइन केलेल्या या टीव्हीएस ऑर्बिटरमध्ये 158 किमी आयडीसी रेंजक्रूझ कंट्रोल34-लीटर बूट स्पेसहिल होल्ड असिस्ट आणि प्रगत कनेक्टेड फीचर्स अशा अनेक या सेगमेंटमधील फीचर्सचा प्रथमच समावेश केला आहे. तसेच या उद्योगातील प्रथमच 14” फ्रंट व्हीलसह, स्कूटर 94,900 (एक्स-शोरूम मुंबईपीएम ई-ड्राइव्ह स्कीमसह) च्या आकर्षक किमतीत आरामदायी प्रवास, अनेक सुविधा देते.

         कनेक्टेड मोबाइल ऍप, व्हिझरसह फ्रंट एलईडी हेडलॅम्प आणि इनकमिंग कॉल डिस्प्लेसह रंगीत एलसीडी क्लस्टर अशा प्रगत वैशिष्ट्यांचा टीव्हीएस ऑर्बिटरमध्ये समावेश आहे, ज्यामुळे ग्राहकांची सोय तर होतेच पण प्रवासाचा आनंद देखील मिळतो. त्याची 3.1 किलोवॅट प्रति तास बॅटरी आणि सुधारित एअरोडायनॅमिक कार्यक्षमता स्थिर, कार्यक्षम कामगिरीसह विस्तारित श्रेणी देते.

        या लाँचबद्दल टीव्हीएस मोटर कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष – प्रमुख कम्युटर आणि ईव्ही व्यवसाय तसेच कॉर्पोरेट ब्रँड आणि मीडिया प्रमुख श्री. अनिरुद्ध हलदर म्हणाले, ईव्ही क्षेत्रात आमचे नेतृत्व मजबूत करण्यासाठी तसेच विश्वास आणि नावीन्यपूर्णतेचा पाया भक्कम करत भारताच्या इलेक्ट्रिक प्रवासाला पुढे नेण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. ग्राहकांच्या वाढत्या गरजांना अनुसरूनटीव्हीएस ऑर्बिटर महाराष्ट्रातील शहरी प्रवासाची पुनर्परिभाषा करण्याच्या आमच्या प्रयत्नांचे प्रतिनिधित्व करते. प्रगत तंत्रज्ञानवाढीव एअरोडायनॅमिक कार्यक्षमताआराम आणि सेगमेंट-फर्स्ट वैशिष्ट्यांसह दैनंदिन व्यावहारिकतेचे संयोजन करते. टीव्हीएस ऑर्बिटर या सेगमेंटमध्ये नवीन बेंचमार्क स्थापित करेलअसा आम्हाला विश्वास आहे. यामुळे शाश्वत गतिशीलता सुलभ होईल.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In उद्योग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

कोल्हापुरातील तरुणाईच्या उज्वल भविष्याचे स्वप्न साकार होणार- आमदार अमल महाडिक

कोल्हापुरातील तरुणाईच्या उज्वल भविष्याचे स्वप्न साकार होणार- आमदार अमल महाडिक कोल्हापूर : …