
no images were found
दत्तजयंतीचे औचित्य साधत पंचगंगा नदीमध्ये पोहणां-या सदस्यांकडून नदी घाटाची स्वच्छता
इचलकरंजी( प्रतिनिधी):-दत्त जयंतीचे औचित्य साधत दिगंदिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या जयघोषात प्रभू श्री दत्तगुरुंच्या चरणी सेवा रूजू करण्याच्या उददेशाने नदी घाटावर दररोज पोहायला येणा-या पंचगंगा जलतरण मंडळाच्या सदस्यांनी नदी घाट स्वच्छता अभियान स्वखर्चातून राबवून नदी घाट स्वच्छ करण्यात आला.
इचलकरंजी येथील पंचगंगा नदीतीरावरील श्री वरदविनायक मंदीराशेजारी असणा-या घाटावर जुलै २०२४ मध्ये आलेल्या महापूरामध्ये नदीच्या पाय-यांवर गाळ येवून पडला होता. सदर घाटावर कोणतेही वाहन जात नसल्यामुळे सदर गाळ काढणे खूपच किचकट होते. नगरपालिकेकडून देखील सदर गाळ काढण्यासाठी कोणतीही तरतूद केलेली नाही. त्यामुळे या गाळाचा नदीवर पाय धूण्यास येणा-या भावीक भक्तांना त्रास होत होता काही वेळेला या गाळातून काचा देखील लागून कांही लोक जखमी झाले आहेत अशा वेळी दररोज पोहयाला येणा-या पंचगंगा जलतरण मंडळाच्या सदस्यांनी त्याचे गांभिर्य ओळखून तो गाळ काढण्याचे ठरवले व घाट स्वच्छता अभियान राबविण्यात आले या अभियानात लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी सहभाग घेतला होता जवळ जवळ १० हून अधिक ट्रॉली गाळ काढण्यात यश आले ५ दिवसांच्या अथक परिश्रमातून महापूरातील आलेला गाळ काढला व नदीतीरावरील घाटाने मोकळा श्वास घेतला.
याआधीही जलतरण मंडळाच्यावतीने वरचेवर नदी घाटावर महादेव मंदीराची स्वच्छता केली जाते तसेच घोरपडे सरकारांच्या समाधी जवळील सर्व परिसराची स्वच्छता केली जाते तसेच २०१९, २०२१ मधील महापूरामध्ये देखील सर्व घाटाची स्वच्छता जलतरण मंडळाच्यावतीने केलेली आहे. अशा प्रकारे सर्व कार्यात सहभाग घेवून पंचगंगा जलतरण मंडळाच्या वतीने नेहमीच सामाजिक कार्यात पुढाकार घेतलेला आहे.
या कामासाठी पंचगंगा जलतरण मंडळाचे उपाध्यक्ष आनंदा पेटकर,विठ्ठल येसाटे,किरण लंगोटे,संपत परदेशी, बिरबल येटाळे, चंगेडिया, चौधरी, उरुंकर, अमोल माने, बाळू बेळगांवे, भांबिष्टये, आनंदा कोरे, गुंडू सुतार, सुभाष पाटील,पालकर,राजू पाटील,राजू पारीख,सुनिल विभुते, प्रकाश सटाले, प्रदीप देशपांडे, राजू जाधव, एकनाथ साखरे, राजू लगारे, सतीश सुतार, अमर शेंदुरे यांनी सहभाग घेतला.