Home शासकीय सुविधा कर्ज व महिला समृध्दी योजनेची कागदपत्रे 31 ऑगस्टपर्यंत जमा करा

सुविधा कर्ज व महिला समृध्दी योजनेची कागदपत्रे 31 ऑगस्टपर्यंत जमा करा

9 second read
0
0
23

no images were found

सुविधा कर्ज व महिला समृध्दी योजनेची कागदपत्रे 31 ऑगस्टपर्यंत जमा करा

 

कोल्हापूर : राष्ट्रीय मागासवर्ग वित्तीय विकास महामंडळ दिल्ली (एनएसएफडीसी, दिल्ली) व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत  सन 2023-24 या वित्तीय वर्षासाठी सुविधा कर्ज योजना 5 लाख व महिला समृध्दी योजना 1.40 लाख रुपये या योजना सुरु करण्यात आल्या आहेत. या योजनांचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरण्यास दिनांक 31 ऑगस्ट 2024 रोजी पर्यंत मुदतवाढ दिली असल्याची माहिती साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आर.एच.चव्हाण  यांनी दिली आहे.

ऑनलाईन भरणा केलेल्या अर्जाची  व त्यासोबत जमा केलेल्या कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रत 3 प्रतीत महामंडळाच्या जिल्हा कार्यालयास जमा करणे आवश्यक आहे. ज्या अर्जदारांनी योजनांमध्ये कर्ज मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत, अशा अर्जदारांनी  ऑनलाईन भरणा केलेल्या अर्जाची  व त्यासोबत जमा केलेल्या कागदपत्रांची प्रत एकूण 3 झेरॉक्स प्रतीत स्वयं साक्षांकित करुन दिनांक 31 ऑगस्ट 2024 रोजी पर्यंत महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात जमा कराव्यात, असे आवाहनही श्री. चव्हाण यांनी दिली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…