पावसाचा जोर पुन्हा वाढला, पंचगंगा काठच्या गावांना इशारा कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या ३ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातील राधानगरी पाणलोट क्षेत्रासह, आजारा, गगनबावडा परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. परिणामी राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत ही झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. राधानगरी धरण सध्या ९५.३३% भरला असून धरणांतून १६०० क्युसेक्सचा विसर्ग सुरू आहे. आज जिल्ह्यात मुसळधार पाऊस …