
no images were found
कोल्हापुरात पावसाची संततधार, १२ सप्टेंबरपर्यंत ‘यलो अलर्ट’, कोकणात अतिवृष्टीचा इशारा
कोल्हापूर : बाप्पाच्या विसर्जनानंतर शनिवारी कोल्हापुरात सकाळपासून पावसाची संततधार सुरू झाली आहे. 12 सप्टेंबरपर्यंत कोल्हापुरला यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकणात अतिवृष्टी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागांत मेघगर्जना, वादळी वारे तसेच विजांच्या कडकडाटात पाऊस हजेरी लावणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.