
no images were found
पनवेलमध्ये विसर्जन घाटावर वीजेचा शॉक लागून ११ जण जखमी
पनवेल : कोळीवाडा विसर्जन घाटावर जनरेटरसाठी जोडणी घेतलेली विजेची तार गणेश भक्ताच्या अंगावर पडल्याची घटना दि. ९ सप्टेला साडे सात वाजण्याच्या सुमारास घडल्याचे समोर आले आहे. या घटनेत तब्बल ११ गणेशभक्त विजेचा शाॅक लागून जखमी झाले आहेत. यापैकी २ गणेशभक्त गंभीर जखमी असून त्याच्यावर पनवेल येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
हर्षद पनवेलकर (वय ३२, रा. कुंभारवाडा), मानस कुंभार (१७, रा. उलवे) यांना उपचारासाठी लाईफलाईन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर निहाल चोनकर (5, सर्वेश पनवेलकर (15), दिलीप पनवेलकर (६५), दिपाली पनवेलकर (२४), वेदांत कुंभार (18), दर्शना शिवशिवकर (36), तनिष्का पनवेलकर (9) यांना उपचारसाठी उपजिल्हा रुग्णालयत दाखल केले आहे. रुपाली पनवेलकर (35) रितेश पनवेलकर (38) यांनी उपचारासाठी पटवर्धन हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.
खल केले आहे. रुपाली पनवेलकर (35) रितेश पनवेलकर (38) यांनी उपचारासाठी पटवर्धन हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.