no images were found
पुण्यात दुसऱ्या दिवशीही विसर्जन मिरवणूक सुरूच
पुणे : पुण्यात गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशीही गणेश भक्तांचा उत्साह पाहायला मिळत आहे. मानाच्या पाचही गणपतीचे काल रात्रीपर्यंत विसर्जन झाले असून दगडूशेठ गणपतीचे विसर्जन झाले. त्यानंतर आता इतर मंडळांची विसर्जन मिरवणूक चालू असून काही प्रमाणात वाहतूक सुरू झाली आहे. आज दुपारनंतर विसर्जन सोहळा पार पडण्याची शक्यता आहे.
दुपारी ३ वाजून १५ मिनिटापर्यंत अलका टॉकीज चौकातून २०६ गणेश मंडळे पुढे सरकली आहेत.
पुण्यात अजूनही विसर्जन मिरवणूक सुरूच आहे. पुण्यात गेल्या 27 तासांपासून विसर्जन मिरवणूक सुरू असून अजूनही अनेक मंडळे अलका टॉकीज चौकात येणं बाकी आहे. यंदा २४ तास उलटून गेले तरीही अजून मिरवणुका सुरूच आहेत. त्यामुळे पुणेकरांनी मिरवणुकीचा विक्रम मोडला आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ सकाळी ६:४५ वा विसर्जनासाठी निघाल्यानंतर
आज दुपारी एक वाजेपर्यंत ६३ मंडळे बेलबाग चौकातून पुढे सरकली आहेत. डिजेच्या आवाजाने पेठा दणाणून गेल्या आहेत. महिला, मुली, तरूणांचा उत्साह मिरवणुकीत दिसून येत आहे. दुसऱ्या दिवशीही जल्लोष कायम असून मानाच्या गणपतीसहित दगडूशेठ गणपतीचे विसर्जन झाले आहे. त्यानंतर पोलिसांकडून इतर मंडळांना पुढे सरककवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचबरोबर पोलिसही ढोल ताशांच्या गजरात जल्लोष करताना दिसत आहेत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा विसर्जन सोहळा पार पडला आहे. पांचाळेश्वर विसर्जन घाटावर विसर्जन झाले असून दरवर्षीपेक्षा यावर्षी विसर्जनाला जास्त वेळ लागला आहे. पोलिस आणि श्रीमंत साईनाथ तरूण मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याची माहिती समोर येत आहे. अलका टॉकीज चौकात दोघांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांनी मंडळ एका जागेवरून पुढे जात नसल्याने कार्यकर्त्यांना पुढे ढकलले. विसर्जन मिरवणूकीला दरवर्षीपेक्षा जास्त उशीर झाल्याने विसर्जन मिरवणुका पुढे नेण्यासाठी आता पोलिस अँक्शन मोड मध्ये आल्याचे दिसून येत आहे.
काल सकाळी सुरू झालेली गणपती विसर्जन मिरवणूक आज देखील सुरू आहे. आज सकाळी ६ चा ठोका पडताच सार्वजनिक मिरवणुकीत डिडीजे जे पुन्हा सुरू झाले आणि अलका टॉकीज मध्ये उभे असलेल्या भाविकांनी डीजे वर ठेका धरला. सुमारे ६.३० ते ७.२० दरम्यान अलका टॉकीज पासून पुढे मार्गस्थ होणाऱ्या प्रत्येक मंडळाने लाऊड स्पीकर लावले होते. यामुळे अलका टॉकीज चौकात एकच गर्दी झालेली पाहायला मिळाली. दरम्यान ही मिरवणूक अजून काही तास सुरू राहणार आहेत.
मेट्रो पुलाची उंची पाहता सगळ्या सार्वजनिक गणेश मंडळांना विसर्जन मिरवणुकीसाठी रथाची उंची ठरवून दिली होती. याच अनुषंगाने पुण्यातील जनार्दन पवळे संघ या मंडळाने विसर्जन मिरवणुकीसाठी हायड्रॉलिक ट्रॉली चा वापर केला. मेट्रो पुलाला कुठला ही अडथळा होणार नाही याची पूर्ण दक्षता घेऊन या मंडळाने हायड्रॉलिक ट्रॉलीचा उपयोग केला. लक्ष्मी रोड वरून येणाऱ्या विसर्जन मिरवणूक रथासाठी १८ फूट उंचीची मर्यादा होती.