no images were found
कोल्हापुरात विसर्जन मिरवणूक तब्बल 30 तास चालली
कोल्हापूर : शहरातून कालपासून सुरु झालेल्या गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूकीची आज दुपारी १ वाजताच्या सुमारास सांगता झाली. शेवटच्या गणेशमूर्ती विसर्जनावेळी बंदोबस्तास असलेल्या पोलिसांनी डॉल्बीच्या ठेक्यावरती ठेका धरत जल्लोष साजरा केला. यावेळी पावसानेही आपली हजेरी दिल्याचे दिसून आले.
शुक्रवारी सकाळी तुकाराम माळी मंडळाच्या गणेशमूर्तीने विसर्जन मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली होती ही विसर्जन मिरवणूक तब्बल 30 तास चालली. शेवटचा भगतसिंग तरुण मंडळाचा गणपती शनिवारी दुपारी एक वाजता सुमारास पापाच्या तिकीटीजवळ आल्यानंतर कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे, करवीरचे प्रांत अधिकारी वैभव नावडकर यांच्या हस्ते गणपतीची आरती करून मिरवणुकीची सांगता करण्यात आली.
कोल्हापूरकरांच्या सहकार्यामुळेच यावर्षीचा गणेश उत्सव अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडल्या असल्याची भावना यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवड व्यक्त केली.
कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने शहरातील चार विभागीय कार्यालयाच्यावतीने गणेशमूर्ती दान करून त्या इराणी खणी परिसरात विसर्जित करण्यात आल्या. मनपाच्या चार विभागीय कार्यालयाअंतर्गत विसर्जन मिरवणुकीत 1273 घरगुती तर सार्वजनिक 986 मंडळाच्या गणेशमूर्तींचे विसर्जित करण्यात आले आहे.
तब्बल दोन वर्षानंतर गणेश मूर्ती विसर्जन सोहळा कोल्हापूरकरांना जल्लोषात साजरा केला. आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी कालपासून गणेश भक्तांचा जनसमुदाय शिवाजी पुतळ्यापासून ते इराणी खणपर्यंत लोटला होता. कालपासून ते आज सकाळी आठपर्यंत 986 गणपतीचे विसर्जित झाले आहे.
यामध्ये पूर्व बाजूच्या गेटमधून 724 गणपती, पूर्वेकडून 42 गणपती तर पश्चिम बाजूच्या गेटमधून 59 गणपती असे एकूण 986 गणपती विसर्जित करण्यात आले आहेत तर त्यापैकी 161 गणेश मूर्ती दान करण्यात आल्या आहेत.