no images were found
ब्रिटनचे महाराजा म्हणून राजे चार्ल्स यांनी स्वीकारला पदभार
लंडन : ब्रिटनच्या सम्राज्ञी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र चार्ल्स यांची महाराजा म्हणून निवड करण्यात आली. महाराज चार्ल्स तिसरे यांनी आज अधिकृतपणे पदभार स्वीकारला आहे. सेंट जेम्स पॅलेसमधील बैठकीत चार्ल्स यांना अधिकृतपणे ब्रिटनचे राजे म्हणून जाहीर करण्यात आले आहे. सेंट जेम्स पॅलेस येथे सोहळ्यात त्यांनी महाराज पदाची शपथ घेतली.
ब्रिटनच्या सम्राज्ञी म्हणून महाराणी एलिझाबेथ या गेली सात दशके कार्यरत होत्या. वयाच्या 96 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर ब्रिटीश राजघराण्याच्या नियमांप्रमाणे प्रिन्स चार्ल्स यांची महाराजपदी निवड करण्यात आली आहे.
चार्ल्स यांना आज महाराज म्हणून जाहीर केले असले तरी त्यांचा राज्याभिषेक सोहळा काही दिवसांनी आयोजित करण्यात येईल. आज होणारा कार्यक्रम हा पदग्रहण सोहळा असणार आहे. राज्याभिषेक सोहळ्यासाठी विशेष तयारी केली जाते. या सोहळ्याचे विशेष नियोजन केले जाते
या पदग्रहण सोहळ्यासाठी ब्रिटनच्या सर्व माजी पंतप्रधान, ज्येष्ठ खासदार, इतर अधिकारी उपस्थित होते.