no images were found
याकूब मेमनच्या चुलतभावासोबत फडणवीस, राज्यपालांचा फोटो! पेडणेकरांचा भाजपवर पलटवार
मुबई : मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी याकूब मेमनचा चुलत भाऊ रऊफ मेमनसोबत एक बैठक घेतल्याचा आरोप करत संबंधित बैठकीचा व्हिडीओ भाजपने प्रसिद्ध केला आहे.यामुळे शिवसेना आणि मेमन यांचे संबध तपासा आणि चौकशी करा अशी मागणी भाजपाकडून केली जात आहे. यावर भाजप नेते आणि रऊफ मेमन यांचे फोटो व्हिडिओ दाखवत पेडणेकरांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
भाजपने केलेले आरोप फेटाळत महापौर असताना धार्मिक स्थळांच्या तक्रारी ऐकण्यासाठी मी गेले होते. बैठकीला कोण कोण उपस्थित होते, याची मला कल्पना नाही. आम्हाला बदनाम करण्याचे षडयंत्र आखलं जात आहे, असा पलटवार किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. किशोरी पेडणेकर यांनी याकूब मेमनचा चुलत भाऊ रऊफ मेमन यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल भगत सिंह कोश्यारी याची भेट घेतल्याचे फोटो आणि व्हिडीओ दाखवून यावर काय बोलाल असा उलट प्रश्नही उपस्थित केला आहे.
भाजपवर पलटवार करत मध्यमांसमोर फोटो आणि व्हिडीओ दाखवले आहेत. तसेच सामान्य घरातील लोकाना बदनाम करू नका अशी हाथ जोडून विनंती केली आहे.आरोप करणाऱ्या भाजपच्या बारा तोंडांनी या फोटोला कॅप्शन द्यावे असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे. तर, काँग्रेसने रऊफ मेमन आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा फोटो ट्वीट केला आहे.