Home देश विदेश अमेरिकन वर्तमानपत्राचा भारतावर गंभीर आरोप, रॉ चा उल्लेख

अमेरिकन वर्तमानपत्राचा भारतावर गंभीर आरोप, रॉ चा उल्लेख

12 second read
0
0
18

no images were found

 अमेरिकन वर्तमानपत्राचा भारतावर गंभीर आरोप, रॉ चा उल्लेख

 

एका अमेरिकन वर्तमानपत्राने मालदीववरुन भारतावर अत्यंत गंभीर आरोप केला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालायने या आरोपांवर रोखठोक उत्तर दिलं व दुटप्पीपणा दाखवून दिला.

       मालदीवमधलं मोहम्मद मुइज्जू यांचं सरकार उलथवण्यासाठी तिथल्या विरोधी पक्षाने भारताकडे 60 लाख अमेरिकन डॉलर्सची मागणी केली होती हा अमेरिकन वर्तमानपत्राचा आरोप भारताने फेटाळून लावला आहे. या दाव्यांमध्ये अजिबात तथ्य नाहीय. त्यात विश्वसनियता नाहीय, असं भारताने म्हटलं आहे. यात ते वर्तमानपत्र आणि रिपोर्टरचा भारताबद्दलचा वैरभाव दिसून येतो असं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे. “तुम्ही ज्या बातम्यांबद्दल बोलत आहात, त्या वॉशिंग्टन पोस्टमध्ये छापून आल्या आहेत. एक मालदीवबद्दल आणि दुसरी पाकिस्तानसोबतच्या संबंधांबद्दल आहे. यातून ते वर्तमानपत्र आणि रिपोर्टरचा भारताबद्दलचा वैरभाव दिसून येतो. तुम्ही या क्रियांचा पॅटर्न बघू शकता. मी तुमच्यावर सोडतो, याची विश्वसनियचता तुम्ही तपासून बघा” असं रणधीर जैस्वाल आठवड्याच्या साप्ताहिक पत्रकार परिषदेत म्हणाले.

        द वॉशिंग्टन पोस्टने एक बातमी प्रकाशित केलीय. त्यात मालदीवच्या विरोधी पक्षाने मोहम्मद मुइज्जू यांचं सरकार पाडण्यासाठी 40 सदस्यांना लाच देण्याचा प्रस्ताव दिला होता. यात मुइज्जू यांच्या पक्षाचे सदस्य सुद्धा होते असं म्हटलय. मोहम्मद मुइज्जू सत्तेवर आल्यानंतर त्यांना कसं हटवायचा या प्लानचा भारतीय गुप्तचर यंत्रणा ‘रॉ’ च्या अधिकाऱ्याने आढावा घेतला असं सुद्धा या बातमीत म्हटलं आहे. मोहम्मद नाशीद हे मालदीव डेमोक्रॅटिक पार्टी म्हणजे तिथल्या विरोधी पक्षाचे नेते आहेत. त्यांनी सुद्धा हे वृत्त फेटाळून लावलं आहे. मोहम्मद मुइज्जू यांच्या सरकार विरोधात असा काही कट रचल्याची आपल्याला कल्पना नाही असं ते म्हणाले. भारताने नेहमीच मालदीवमध्ये लोकशाहीच समर्थन केलं असून अशा कृत्यांना कधी थारा दिलेला नाही असं मोहम्मद नाशीद म्हणाले.

क्लिंटन यांचं वाक्य ऐकवलं

भारताने पाकिस्तानात स्पेशल ऑपरेशन करुन लष्कर-ए-तयबा आणि जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांना संपवल्याचा आरोपही फेटाळून लावला. त्यांनी अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांच वाक्यच ऐकवलं. “तुम्ही तुमच्या अंगणात साप पाळून त्यांनी फक्त शेजाऱ्यांना दंश करावा अशी अपेक्षा करु शकत नाही” हे क्लिंटन यांचं वाक्य ऐकवलं.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

तळातील समाजघटकांना परवडणारे तंत्रज्ञान अभियंत्यांनी विकसित करावे.- डाॅ. प्रतापसिंह देसाई.

  तळातील समाजघटकांना परवडणारे तंत्रज्ञान अभियंत्यांनी विकसित करावे.- डाॅ. प्रतापसिंह …