no images were found
राजाने अटलला दरबारात का बोलावले?
अटलने सुदर्शन त्रिपाठी (माधव अभ्यंकर) आणि सुशिला बुआ (दीपा सावरगावकर) यांच्या दुष्ट योजनेचा धाडसाने सामना करण्यादरम्यान स्वत:ची स्कूल बॅग पुन्हा मिळवल्यानंतर त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. सुदर्शन आपल्या साथीदारांच्या मदतीने अटलला धमकावतो आणि ग्वाल्हेर सोडून बटेश्वरला जाण्यास भाग पाडतो. कृष्णा देवी ऊर्फ नेहा जोशी म्हणाल्या, ”अटल, प्रेम व सदा यांच्यासोबत शाळेमधून परत आल्यानंतर क्रिष्णन बिहारीला (आशुतोष कुलकर्णी) सुदर्शनचा एक सहकारी घेरतो, त्याला धक्काबुक्की करतो आणि त्याच्या खिशामध्ये नोट टाकून घाईघाईने निघून जातो. रक्ताने माखलेली नोट पाहून क्रिष्णन बिहारीला पुढे घडणाऱ्या भीषण वास्तविकतेची जाणीव होते. अटल सुदर्शनला भेटून त्याचे कारस्थान बंद करण्याचे आवाहन करतो. पण सुदर्शन अटलला भांडण मिटवण्यासाठी ग्वाल्हेर सोडून जाण्यास सांगतो. इतर लोक तेथून जात असताना अटलच्या मनात त्याच्या वडिलांवर होणाऱ्या हल्ल्याबाबत विचार सूरू होतात, ज्यामुळे तो चक्कर येऊन खाली पडतो. त्याचे दादाजी (मिलिंद दस्ताने) त्याला बेशुद्ध अवस्थेत पाहतात आणि घरी घेऊन येतात. अटल शुद्धीवर आल्यानंतर सुशिला बुआ सर्वांच्या सुरक्षिततेसाठी अटलला बटेश्वरला पाठवण्याचा सल्ला देते.”
रोमांचक घटना अटलला ग्वाल्हेर सोडून जाण्यापासून विरोध करतात. कृष्णा देवी ऊर्फ नेहा जोशी पुढे म्हणाल्या, ”अटल जाण्याची तयारी करत असताना सुदर्शन व त्याची माणसे मोहल्लामध्ये येतात. सुदर्शन शंख वाजवतो आणि अटलला सांगतो की त्याला अटलने सुरूवात केल्याप्रमाणेच भांडणाचा शेवट करायचा आहे. दरम्यान, क्रिष्णन बिहारी उशीर होत असल्यामुळे अटलला जाण्यास सांगतो. राजाचे प्रतिनिधी व शिपाई येतात आणि अटलच्या हेतूंबाबत चौकशी करतात. सुदर्शन त्वरित प्रतिनिधींना अटल ग्वाल्हेर सोडून बटेश्वरला जात असल्याचे सांगतो. राजाचे प्रतिनिधी सर्वांसमोर घोषणा करतात की राजा अटलच्या शाळेमधील कृतींबाबत प्रभावित झाले आहेत आणि सायंकाळी अटलला भेटायचे आहे, ज्यामुळे अटल ग्वाल्हेर सोडून जात नाही. त्यानंतर अटल त्याच्या कुटुंबाला सामना कराव्या लागलेल्या आव्हानांबाबत प्रतिनिधीला सांगतो. अटलच्या अवस्थेबाबत निराशा व्यक्त करत प्रतिनिधी सुदर्शनला चेतावणी देतो आणि क्रिष्णन बिहारीवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यास सांगतो, अन्यथा राजासमोर उभे केले जाण्याची चेतावणी देतो. अटलला आश्वासन देत प्रतिनिधी सायंकाळच्या वेळी राजाच्या दरबारात उपस्थित राहण्याची विनंती करतो.”