
no images were found
भारतात ६ राज्यांत कोरोना रुग्णांमध्ये किंचित वाढ
नवी दिल्ली : गेल्या नऊ आठवड्यांमध्ये भारतात कोरोना संसर्गाची नवीन प्रकरणं दर आठवड्यात कमी होत असताना, गेल्या आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या देशात ११ टक्के वाढलीये. १२ ते १८ डिसेंबर दरम्यान एका आठवड्यात देशात ११०३ रुग्णांची नोंद झाली, तर १९ ते २५ डिसेंबर दरम्यान देशातील कोरोना रुग्णांची संख्या १२१९ वर पोहोचली आहे. मध्य भारतातील महाराष्ट्र राजस्थान, पंजाब, दिल्ली, उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश, दक्षिण भारतातील तेलंगणा आणि पूर्व भारतातील ओडिशा या राज्यांचा समावेश आहे.
तसेच इतर देशांमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नवीन सबवेरियंट BF.7 मुळं किंवा चीनमध्ये कोरोना प्रकरणांमध्ये वाढ झाल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारच्या वाढत्या चाचण्यांमुळं कोरोनाची ही प्रकरणं वाढली आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कोरोना संसर्गामुळं मृत्यूची संख्या अजूनही खूपच कमी आहे. १९-२५ डिसेंबर दरम्यान देशात १२ मृत्यू झाले आहेत, तर १२_१८ डिसेंबर दरम्यान २० मृत्यूची नोंद झाली आहे .
मागील आठवड्यातील आकडेवारीशी तुलना केली तर १६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचं समोर आलं आहे. इतर नऊ राज्यांमध्ये संसर्ग झालेल्यांची संख्या गेल्या आठवड्याइतकीच राहिली आहे. ज्या राज्यांत कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे, त्यापैकी फक्त राजस्थान आणि पंजाब ही अशी आहेत, जिथं गेल्या आठवड्याच्या तुलनेत बाधितांची संख्या ३० ने वाढली आहे तर, केरळमध्ये बाधितांची संख्या ३१ ने कमी झाली आहे .