
no images were found
भीमा कोरेगाव येथे होणाऱ्या शौर्य दिनासाठी प्रशासन सज्ज
पुणे : भीमा कोरेगाव येथे होणाऱ्या शौर्य दिनासाठी जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. जयस्तंभला अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने अनुयायी भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी रोजी दाखल होतात. १ जानेवारीला खराडी ते शिक्रापूर मार्ग त्याचबरोबर या परिसरातील रस्तेही वाहतुकीसाठी राहणार बंद राहणार आहेत.
भीमा कोरेगाव येथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. पुणे शहरातील ३५००-४००० पोलिस तैनात असणार आहेत. पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित असणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात सी सी टिव्ही द्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहेत. अनुयायी यांच्यासाठी १८० पी एम पी एल बसेस सेवेत राहणार आहेत. या कार्यक्रमाचे थेट प्रेक्षपण लाईव्ह पाहता येणार आहे. अनुयायी यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यात आले असून, वैद्यकीय कक्ष देखील उभारण्यात येणार आहेत.