no images were found
दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली
दिल्ली : दिल्लीमध्ये आजाद मार्केट या परिसरात एक 4 मजली इमारत कोसळली आहे. या दुर्घटनेत 6-7 लोक इमारतीखाली दबले गेल्याचे कळते. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ४ चार गाड्या घटनास्थळी त्वरित दाखल झाल्याचे विभागाने सांगितले. ही घटना सकाळी आठच्या सुमारास घडली.
उपलब्ध माहितीनुसार, ही इमारत बांधण्यात आलेली असून अजूनही याठिकाणी बांधकाम सुरू असल्याचे कळते. इमारतीमध्ये केबल टाकण्याचे काम चालू होते. आतापर्यंत चार लोक जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेच्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, इमारत कोसळली तेव्हा इमारतीमध्ये मोठा स्फोट झाला, यामधील गंभीर जखमीना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. एका प्रत्यक्षदर्शीने असे सांगितले की, इमारतीची रचना अत्यंत कमकुवत असून इमारतीचे बांधकाम मोठ्या निष्काळजीपणे करण्यात आलेले आहे. या इमारतीचे बांधकाम कामगार लगबगीने संपवत होते. ही 4 मजली इमारत फक्त महिनाभरात उभी केली आणि तिच्या मजबुतीकडे लक्ष दिले गेलेले नाही, त्यामुळे ही दुर्घटना घद्ल्याचा अंदाज वर्तवला.