no images were found
द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी ‘देहात’चा अनोखा उपक्रम
सांगली : भारतीय शेतकऱ्यांना उत्तम मूल्य मिळवून देणे आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा करणे या दिशेने आपल्या प्रवासात भारतातील देहात या सर्वात मोठ्या फुल स्टॅक ॲग्रीटेक व्यासपीठ असलेल्या कंपनीने आणखी एक पाऊल उचलले आहे. नाशिकमधील निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कंपनीने प्रगत शेतकरी परिसंवादाचे आयोजन केले होते. निर्यातीचे व्यावसायिक व्यवहार करण्यासाठी देहात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना कसे सक्षम करते, याबद्दलची आवश्यक माहिती परिसंवादात देण्यात आली. द्राक्ष पिकांच्या जीवनचक्राबद्दल यात सर्वांगीण माहिती देण्यात आली. यात उच्च दर्जाची शेती उत्पादने, माती परीक्षणाच्या सेवा, शेतकी तज्ञांशी सल्ला-मसलत, आर्थिक आधार, बाजारपेठेशी संलग्नता, प्रमाणपत्र मिळविणे इत्यादींचा समावेश होता जेणेकरून या शेतकऱ्यांना त्यांचा निर्यात व्यवसाय सुलभपणे करता यावा. प्रसिद्ध हवामान अंदाजतज्ञ पंजाब डख हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी द्राक्ष लागवडीशी संबंधित हवामानाच्या स्थितीबद्दल मोलाची माहिती पुरवली.
या कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्रातील ३५० पेक्षा अधिक द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी भाग घेतला. देहातचे वरिष्ठ टीम मेंबर तसेच कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड आणि सिंजेंटा इंडिया यांसारख्या प्रतिष्ठित कंपन्यांचे अधिकारी परिसंवादाला उपस्थित होते.