no images were found
नंदवाळ-कांडगाव हद्दीत बिबट्या सदृश्य प्राण्याचे दर्शन
कोल्हापूर : नंदवाळ-कांडगाव या दोन गावांच्या हद्दीवर डोंगर परिसरातील नागटेक या ठिकाणी बिबटयासदृश्य प्राणी दिसल्याची माहिती मिळाली आहे. या भागातील शेतकरी बाजीराव शिंदे हे नित्याप्रमाणे सकाळी आपल्या शेताकडे गेले होते. याचवेळी त्यांना त्यांच्या सोयाबीन पिक शेताच्या बांधावर सदर प्राणी बसलेला आढळला. त्यांनी तात्काळ ही माहिती गावातील नागरिकांना तसेच ग्रामप्रशासनाला कळविली.
ग्रामप्रशासनाने नंदवाळसह शेजारील कांडगाव, जैताळ, देवाळे गावातील शेतकऱ्यांना सतर्क केले आहे. याबाबत वनविभागाला कळविले असून वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल होणार असल्याची माहिती नंदवाळचे ग्रामविकास अधिकारी उत्तम पाटील यांनी दिली आहे.
सोशल मिडियवरून मेसेच व्हायरल झाल्याने नागरिकांत भीती तसेच संभ्रम निर्माण होऊ शकतो. हा प्राणी नेमका कोणता आहे हे खात्रीलायक समजल्याशिवाय लोकांनी अशी माहिती प्रसारित करु नये असे आवाहन नंदवाळ ग्रामप्रशासनाने केले आहे. ग्रामप्रशासनाने नंदवाळसह शेजारील कांडगाव, जैताळ, देवाळे गावातील शेतकऱ्यांना सतर्क केले आहे.