Home क्राईम 200 कोटींच्या ड्रग्जसह पाकिस्तानी बोट जप्त

200 कोटींच्या ड्रग्जसह पाकिस्तानी बोट जप्त

0 second read
0
0
176

no images were found

200 कोटींच्या ड्रग्जसह पाकिस्तानी बोट जप्त

भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने भारतीय हद्दीत घुसलेली पाकिस्तानची बोट जप्त केली आहे. या कारवाईमध्ये 200 कोटी रुपयांचे 40 किलो ड्रग्ज जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. पुढील तपास व कारवाईसाठी बोट व बोटीचे पाकिस्तानी चालक यांना जाखू येथे आणण्यात आले आहे. गुजरात एटीएसकडून अंमली पदार्थ विरोधी कारवाईचे सत्र सध्या सुरूच आहे. याच कारवाई दरम्यान काही महिन्यांपूर्वी केलेल्या कारवाईत अंमली पदार्थाचा साठा जप्त केला होता. गुजरात एटीएस आणि डीआरआयने कोलकाता येथे केलेल्या कारवाईत 200 कोटीचे ड्रग्ज जप्त केले असून स्क्रॅप बॉक्समधून 40 किलो ड्रग्ज दुबई येथून भारतात आणले जात असल्याचे वृत्त आहे.

कोलकाता येथे करण्यात आलेल्या कारवाईत गुजरात पोलीस तटरक्षक बल, एनसीबी, पंजाब, दिल्ली पोलीस आणि अन्य एजन्सीने संयुक्त मोहीम यांचेकडून ही कारवाई राबवण्यात आली होती. या कारावाईमध्ये 12 गिअर बॉक्समध्ये लपवण्यात आलेले 200 कोटीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. हे ड्रग्ज दुबईच्या जेबेल अली पोर्ट येथून शिपिंग कंटेनरमध्ये पाठवण्यात आले होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

दूरशिक्षणची  एमबीए प्रवेश प्रक्रिया फेरी 

दूरशिक्षणची  एमबीए प्रवेश प्रक्रिया फेरी   कोल्हापूर (प्रतिनिधी): – श…