Home मनोरंजन अभिनेत्रींनी सांगितले त्‍यांच्‍या वॉर्डरोब कलेक्‍शन्‍सप्रती आवडीबाबत!

अभिनेत्रींनी सांगितले त्‍यांच्‍या वॉर्डरोब कलेक्‍शन्‍सप्रती आवडीबाबत!

3 min read
0
0
15

no images were found

अभिनेत्रींनी सांगितले त्‍यांच्‍या वॉर्डरोब कलेक्‍शन्‍सप्रती आवडीबाबत!

फॅशन म्‍हणजे फक्‍त आकर्षक पोशाख परिधान करणे नसून व्‍यक्तिमत्त्व, संस्‍कृती आणि उत्‍साहित क्षणांची अभिव्‍यक्‍ती आहे. अनेकांसाठी त्‍यांच्‍या वॉर्डरोबमधील विशिष्‍ट पीसेसचे खास स्‍थान आहे, ज्‍यामधून अद्वितीय गोष्‍टी सांगितल्‍या जातात, ज्‍या स्‍टाइल व भावनेच्‍या प्रतीक आहेत. एण्‍ड टीव्‍हीवरील अभिनेत्री स्मिता साबळे (मालिका ‘भीमा’मधील धनिया), गीतांजली मिश्रा (मालिका ‘हप्‍पू की उलटन पलटन’मधील राजेश) आणि शुभांगी अत्रे (मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील अंगूरी भाबी) त्‍यांच्‍या स्‍पेशल कलेक्‍शनबाबत सांगत आहेत, ज्‍यामधून पारंपारिक व समकालीन फॅशनसाठी त्‍यांचे प्रेम दिसून येते. मालिका ‘भीमा’मधील स्मिता साबळे ऊर्फ धनिया म्‍हणाल्‍या, ”कॉलेजमध्‍ये असताना मला कुर्ती आवडू लागल्‍या आणि तेव्‍हापासून ही आवड वाढत गेली आहे. माझ्या वॉर्डरोबमध्‍ये विविध प्रकारच्‍या कुर्ती आहेत, ज्‍या प्रत्‍येक प्रसंग व मूडसाठी योग्‍य आहेत. आधुनिक आकर्षकतेला सादर करणाऱ्या आकर्षक, समकालीन प्रिंट्सपासून गुंतागूंतीचे भरतकाम असलेल्‍या कुर्तींमधून भारताचा संपन्‍न वारसा दिसून येतो, तसेच माझ्या कलेक्‍शनमध्‍ये विविधता आहे. मला विशेषत: सणासुदीच्‍या काळादरम्‍यान आकर्षक अनारकली कुर्ती परिधान करायला आवडते, ज्‍या कुर्ती शाही व उत्‍सवी उत्साहाशी अनुकूल आहेत. कॅज्‍युअल आऊटिंग्‍जपासून रोजच्‍या परिधानासाठी आकर्षक रंगांमधील कॉटन कुर्तींमधून मिळणारा आरामदायीपणा इतर कशामधून मिळू शकत नाही. तसेच, लटकन व आरसे असलेल्‍या माझ्या बोहो-स्‍टाइल कुर्ती देखील आहेत, ज्‍या माझ्या लुकमध्‍ये उत्‍साहीपणाची भर करतात. माझ्या कलेक्‍शनमधील प्रत्‍येक पीसमधून माझे व्‍यक्तिमत्त्व दिसून येते आणि मला परंपरा व आरामदायीपणाप्रती आवड कायम ठेवत स्‍टाइलसह प्रयोग करता येतो.”

मालिका ‘हप्‍पू की उलटन पलटन’मधील गीतांजली मिश्रा ऊर्फ राजेश म्‍हणाल्‍या, ”मला झुमके खूप आवडतात आणि ते माझ्या ज्‍वेलरी कलेक्‍शनमध्‍ये आहेत. हलणारे झुमके पाहून खूप छान वाढते, जे साध्‍या आऊटफिटमध्‍ये देखील मोहकतेची भर करतात. माझे कलेक्‍शन खजिन्‍यासारखे आहे, ज्‍यामध्‍ये सर्व स्‍टाइल्स व आकारांचे झुमके आहेत. माझ्याकडे सणासुदीचा काळ व विवाह सोहळ्यांसाठी परिपूर्ण पारंपारिक झुमके, विविध रंगांमधील मीनाकरी झुमके आहेत, जे साध्‍या आऊटफिट्सना देखील आकर्षक करतात, तसेच ऑक्सिडाइज्‍ड सिल्‍व्‍हर झुमके आहेत, जे समकालीन, बोहेमन वाइब देतात. माझ्याकडे मोत्‍यांनी सजलेले झुमके देखील आहे, जे खूप आकर्षक आहेत आणि माझ्या लुकला त्‍वरित आकर्षक करू शकतात. माझ्या कलेक्‍शनमधील प्रत्‍येक पीस स्‍पेशल आहे, ज्‍यामधून भारताची संपन्‍न संस्‍कृती व कलाकृती दिसून येते. झुमके परिधान केल्‍यानंतर मला आकर्षक वाटण्‍यासोबत आपल्‍या परंपरांशी दृढ संलग्‍न असल्‍यासारखे वाटते.” मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील शुभांगी अत्रे ऊर्फ अंगूरी भाबी म्‍हणाल्‍या, ”साड्या माझ्यासाठी फक्‍त पोशाख नसून भावना आहेत आणि मला माझ्या संस्‍कृतीशी संलग्‍न करतात. बालपणी मी माझ्या आईचे आकर्षकता व मोहकतेसह साडी नेसण्‍याच्‍या पद्धतीसाठी कौतुक करायचे. आज, माझ्या कलेक्‍शनमध्‍ये विविध साड्या आहेत, ज्‍यांच्‍या स्‍वत:च्‍या गोष्‍टी आहेत. मला गुंतागूंतीचे जरीवर्क असलेल्‍या कांजीवरम साड्या आवडतात, ज्‍यामधून दक्षिण भारताची संपन्‍न संस्‍कृती दिसून येते आणि माझ्या बनारसी सिल्‍क साड्या कालातील भव्‍यता व ऐश्‍वर्यतेच्‍या प्रतीक आहेत. कॅज्‍युअल आऊटिंग्‍जसाठी मी कोमल, आकर्षक शिफॉन साड्या परिधान करते. सर्व साड्यांमध्‍ये माझ्या मनात एका साडीचे विशेष स्‍थान आहे, ती म्‍हणजे शाही निळ्या रंगाची कांजीवरम साडी, जी १५ वर्षांपूर्वी माझ्या आईने मला भेट म्‍हणून दिली होती. ही फक्‍त साडी नसून त्‍यामध्‍ये भावना व आठवणी सामावलेल्‍या आहेत, ज्‍यामुळे प्रत्‍येकवेळी ती साडी नेसल्‍यानंतर मला प्रेम व उत्‍साहाचा अनुभव मिळतो. साडी नेसताना मला मनमोहक आणि आपल्‍या भारतीय परंपरांशी दृढ संलग्‍न असल्‍यासारखे वाटते. हा कालातीत पेहराव आहे, जो सदैव माझ्या आवडीचा राहिला आ‍हे. नुकतेच मी माझ्या काही फोटोशूट्समध्‍ये साड्यांप्रती माझे प्रेम दाखवले आहे, जेथे मला विविध ड्रेप्‍स व स्‍टाइल्‍ससह प्रयोग करण्‍याची संधी मिळाली. पारंपारिक लुक असो किंवा साडी नेसण्‍यामधील आधुनिक ट्विस्‍ट असो या शूटमुळे मला या आकर्षक पेहरावाप्रती माझी सखोल आवड व्‍यक्‍त करता आली.”       

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

प्रिया ठाकूरची अविस्मरणीय जयपूर डायरीज

प्रिया ठाकूरची अविस्मरणीय जयपूर डायरीज झी टीव्हीवरील ‘वसुधा’ ही मालिका आपल्या भावनिक आणि र…