
no images were found
‘तेनाली रामा’मध्ये तेनाली रामाचा विजयनगर साम्राज्यासाठी धोका निर्माण करणाऱ्या गिरगिट राजशी आमना-सामना
सोनी सबवरील ‘तेनाली रामा’ मालिका तेनालीरामा (कृष्ण भारद्वाज)च्या बुद्धीचातुर्याच्या कहाण्यांमुळे लोकप्रिय झाली आहे. अलीकडच्या भागांमध्ये तेनाली आपल्या विजयनगर साम्राज्यात परत आला आहे. येथे नवीन आव्हाने त्याच्यासमोर आहेत. भयंकर संकटाविरुद्ध विजयनगर साम्राज्याचे रक्षण करण्यासाठी तो आपले चातुर्य आणि विनोदबुद्धी या आयुधांसह सज्ज झाला आहे. प्रेक्षकांनी पाहिले आहे की, तेनाली दोन वर्षांनी विजयनगरात परतला आहे आणि दरबारातील विरोधाचा त्याला सामना करावा लागत आहे. स्वतः तेनाली मात्र राज्यांवर आलेल्या संकटाचा सामना कसा करावा या विचारात मग्न आहे. त्याची हुशारी आणि निर्धार यांची कसोटी लागणार आहे.
आगामी भागांमध्ये तेनाली रामाचा गिरगिट राज (सुमित कौल)शी सामना होतो. गिरगिट राज एक रहस्यमय व्यक्तिमत्व आहे, ज्याच्याकडे मायावी ताकद आहे आणि तो विजयनगर सम्राज्याविरुद्ध कट-कारस्थान करत आहे. विविध घटनांचा अर्थ लावताना रामाच्या हे लक्षात येते की दोन वर्षांपूर्वी जे विचित्र प्रसंग घडले, त्यामागे गिरगिट राजचे कारस्थान होते. आणि त्यामुळेच तेनालीला विजयनगरातून हद्दपार करण्यात आले होते.
वेळ कमी आहे, विजयनगर साम्राज्याला त्याच्यावर घोंघावणाऱ्या संकटापासून वाचवण्यासाठी तेनाली गिरगिट राजवर कुरघोडी करू शकेल का?
तेनाली रामाची भूमिका करणारा कृष्ण भारद्वाज म्हणतो, “दोन वर्षांनंतर विजयनगराच्या दरबारात परतणे हा तेनालीसाठी एक भावुक क्षण आहे. परंतु राज्यावर संकट आलेले असताना भूतकाळ उकरत बसायला तेनालीकडे उसंत नाही. तेनालीचा थेट गिरगिटराजशी सामना होणार आहे, मात्र त्यावेळी त्याला याची कल्पना नसते की, विजयनगरातून तेनालीची हकालपट्टी होण्यामागे त्याचाच हात आहे आणि आता तो हे राज्य नष्ट करण्याचे कुटिल कारस्थान रचत आहे. प्रेक्षकांना विजयनगर साम्राज्याचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध असलेल्या तेनाली रामाचे असामान्य बुद्धी चातुर्य आणि दृढ निर्धार दिसून येईल. या भागांमध्ये कलाटण्या आणि प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारे क्षण भरलेले आहेत.”