
no images were found
‘श्रीमद् रामायण’ मध्ये सहस्रमुख रावणाशी झालेल्या सामन्यात सीतेचा रुद्रावतार बघा
सोनी सबवरील ‘श्रीमद् रामायण’ मालिकेत श्रीराम (सुजय रेऊ) आणि सीता (प्राची बंसल) यांची दिव्य कथा पडद्यावर साकारली आहे. अलीकडच्या भागांमध्ये, प्रेक्षकांनी पाहिले की, लव (शौर्य मंडोरिया) आणि कुश (अथर्व शर्मा) अयोध्येच्या प्रजेचा दृष्टिकोन बदलण्यात यशस्वी होतात आणि हे सिद्ध करून दाखवतात की, महिला देखील पुरुषांइतक्याच समर्थ असतात. त्या दोन कुमारांचे कर्तृत्व पाहून प्रभावित झालेले श्रीराम त्यांना बक्षीस देण्याचे ठरवतात. त्यावेळी लव आणि कुश सांगतात की, ते दोघे श्रीराम आणि सीतेचे पुत्र आहेत आणि सीतेला पुन्हा अयोध्येत मानाचे स्थान मिळावे अशी त्यांची इच्छा आहे. परंतु हे घडू न देण्यासाठी सहस्रमुख रावण (प्रणीत भट्ट) आडवा येतो.
आगामी भागांमध्ये, प्रेक्षक श्रीराम आणि सहस्रमुख रावण यांच्यातील तुंबळ युद्ध पाहतील. अपरिमित ताकद असूनही श्रीराम रावणाला हरवू शकत नाहीत, कारण त्याला हे वरदान मिळालेले असते की त्याचा वध स्त्रीकडूनच होऊ शकेल. आपल्या पतीला संकटात पाहून सीता त्याच्या मदतीस धावून जाते. एका दिव्य क्षणी, ती मा कालीचा रुद्र अवतार धारण करते. ती युद्धभूमीत उतरताच तेथील गोंधळ शांत होतो आणि रावण भयभीत होतो. प्रेक्षक सीतेचे मा कालीत रूपांतर होण्याचा दिव्य क्षण बघू शकतील. या परिवर्तनाचा गर्भितार्थ हाच आहे की एक स्त्री सीतेसारखी सौम्य आणि मा कालीसारखी उग्र देखील होऊ शकते. धर्म स्थापनेसाठी निर्मिती आणि विनाशाची दुहेरी ताकद एका स्त्रीमध्ये असते.
‘श्रीमद् रामायण’ मालिकेत सीतेची भूमिका करणारी प्राची बंसल म्हणते, “सीतेमध्ये भक्ती आणि ताकद यांचे अचूक संतुलन आहे. ती निर्माण करणारी, पोषण करणारी आहे आणि अत्यंत कणखर आहे. श्रीरामाप्रतीची तिची निष्ठा आणि प्रेम वादातीत आहे. जेव्हा सहस्रमुख रावणासारखा कुणी तिच्या पतीसाठी धोका निर्माण करतो, तेव्हा ती रणचंडीचे रूप घेते. त्या क्षणी ती शक्ती-स्वरूप मा काली होते आणि न्यायासाठी आणि संतुलन स्थापित करण्यासाठी युद्ध करण्यास सज्ज होते. स्त्री जशी सौम्य, पोषणकर्ती असते तशीच ती वेळ आली की उग्र आणि रौद्र अवतार देखील धारण करू शकते हे दाखवून देणारी व्यक्तिरेखा साकार करण्याचे भाग्य मला लाभले आहे, असे मला वाटते.”