
no images were found
कोल्हापुरातील ऑनर किलींग प्रकरणी दोघा भावांना जन्मठेप
कोल्हापूर- बहिणीनं आंतरजातीय विवाह केला म्हणून बहिण आणि तिच्या पतीचा दोघा भावांनी खून केला होता.या खटल्याचा आज निकाल लागला.जिल्हा सत्र न्यायालयानं यामध्ये दोघा भावांना जन्मठेपेची तर त्यांना मदत करणार्याच मित्राला साडेतीन वर्षे सक्तमजूरीची शिक्षा सुनावलीय. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस.पी.गोंधळेकर यांनी दिला निर्णय. सरकारी पक्षाच्या वतीनं अॅ ड.विवेक शुक्ल यांनी काम पाहिलं.
शाहूवाडी तालुक्यातील थेरगांव इथली मेघा पाटील आणि पन्हाळा तालुक्यातील बच्चे सावर्डे इथला इंद्रजीत कुलकर्णी यांनी प्रेमविवाह केला होता. या प्रेमविवाहाला मेघाच्या घरच्यांचा विरोध असल्यामुळं हे दोघे कसबा बावड्यातील गणेश कॉलनी परिसरात भाड्यानं राहत होते. १५ डिसेंबर २०१५ रोेजी मेघाचे भाऊ गणेश आणि जयदीप यांनी बावड्यातील त्यांच्या घरात घुसून मेघा आणि इंद्रजीत या दोघांची हत्या केली.बहिणीनं पळून जाऊन आंतरजातीय लग्न केल्यानं मानहानी झाल्याच्या रागातून गणेश आणि जयदीप यांनी टोकाचं पाऊल उचललं.याप्रकरणी या दोघांसह त्यांना मदत करणारा त्यांचा मित्र नितीन काशीद यालाही पोलीसांनी अटक केली.
या खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन आज जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस.पी.गोंधळेकर यांनी आरोपी गणेश आणि जयदीप पाटील या दोघांना जन्मठेप तर त्यांना मदत करणारा नितीन काशीद याला साडेतीन वर्षांची सक्तमजूरीची शिक्षा सुनावलीय.या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीनं अॅिड.विवेक शुक्ल यांनी काम पाहिलं. देम्यान, नागराज मंजुळे यांच्या सैराट या चित्रपटातून ऑनर किलींग प्रकारावर भाष्य करण्यात आलं होतं.या चित्रपटाचा शेवट सर्वांनाच अंतर्मुख करायला लावणारा होता.परंतु हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या पाच महिन्यापूर्वी या चित्रपटातील शेवटा सारखाच प्रकार कसबा बावड्यात घडला होता.