no images were found
शिवलिंगाला संरक्षण कायम; सुप्रीम कोर्टाचा निर्णय
नवी दिल्लीः सुप्रीम कोर्टाने ज्ञानवापीतील शिवलिंगाला संरक्षण दिलं आहे. याप्रकरणी हिंदू पक्षाला उत्तर देण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत देण्यात आलेली आहे. पुढील आदेशापर्यंत हे संरक्षण कायम राहणार आहे.
वाराणसी येथील शंकराच्या मंदिराशेजारी एक ज्ञानव्यापी मशीद आहे. ज्ञानवापीमधील श्रृंगार गौरीची पूजा करण्यास परवानगी देण्यासाठी पाच हिंदू महिलांनी एक याचिका दाखल केली होती. पण या ज्ञानवापीमशिदीच्या अंजुमन इंतजामिया कमेटीने या महिलांच्या याचिकेला आव्हान दिले होते. या समितीने न्यायालयात प्रार्थनास्थळ कायदा 1991 चा संदर्भ देत यावर सुनावणी घेण्यास विरोध केला होता. मात्र, न्यायालयाने या प्रकरणात सुनावणी घेण्यास परवानगी दिल्याने सध्या यावर सुनावणी होत आहे. याशिवाय मशीद परिसरामध्ये शिवलिंग असल्याचा दावा करण्यात आलेला होता. याप्रकरणी न्यायालयाने मागच्या आदेशामध्ये शिवलिंगाला संरक्षण दिलेलं आहे. आज सुप्रीम कोर्टाने शिवलिंगाला संरक्षण देण्याच्या निर्णयाला वाढीव मुदत दिली आहे. पुढील आदेशापर्यंत हे संरक्षण कायम राहणार आहे.