Home क्राईम जम्मू-काश्मीरमध्ये बस दरीत कोसळून 11 जणांचा मृत्यू, 8 जण जखमी

जम्मू-काश्मीरमध्ये बस दरीत कोसळून 11 जणांचा मृत्यू, 8 जण जखमी

0 second read
0
0
55

no images were found

जम्मू-काश्मीरमध्ये बस दरीत कोसळून 11 जणांचा मृत्यू, 8 जण जखमी

श्रीनगर :  पुंछमध्ये  आज (बुधवार) सकाळी मिनी बसचा भीषण अपघात झाला आहे. पुंछच्या सवजियान भागात आज पहाटे एक मिनी बस दरीत कोसळली. या अपघातात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मंडी तहसीलदार शहजाद लतीफ यांनी दिली.

बसने जाणाऱ्या प्रवाशांना रस्त्यात मृत्यूनं गाठलं. भीषण अपघात झाला. यामध्ये 11 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 25 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पुंछमधील सावजियान भागात हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. जखमींवर मंडी इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेवर शोक व्यक्त करत नायब राज्यपालांनी मृतांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याची घोषणाही केली.

Load More Related Articles

Check Also

शहरामध्ये उघडयावर पडलेल्या 257 टायरी जप्त

शहरामध्ये उघडयावर पडलेल्या 257 टायरी जप्त कोल्हापूर (प्रतिनिधी):- महापालिकेच्या आरोग्य विभ…