Home क्राईम गोवंडी सुधारगृहातून ६ अल्पवयीन मुली गेल्या पळून, काही तासांत दोघी परतल्या

गोवंडी सुधारगृहातून ६ अल्पवयीन मुली गेल्या पळून, काही तासांत दोघी परतल्या

1 second read
0
0
122

no images were found

गोवंडी सुधारगृहातून ६ अल्पवयीन मुली गेल्या पळून, काही तासांत दोघी परतल्या

मुंबई :  मुंबईतील गोवंडी भागातील सुधारगृहातून सहा अल्पवयीन मुली पळून गेल्या होत्या. मात्र, त्यातील दोघी काही तासांनंतर स्वेच्छेने परतल्या. एका पोलीस अधिकाऱ्याने सोमवारी यासंदर्भात माहिती दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे सायन-ट्रॉम्बे रोडवरील सुधारगृहातून सुमारे १५-१७ वयोगटातील सहा मुलींनी खिडकीचे ग्रील दगडाने फोडून पळ काढला होता. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीवरून, त्यांना पळून जाण्यास कोणीतरी मदत केली होती. त्यामुळे अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. रविवारी रात्री उशिरा दोन्ही मुली स्वेच्छेने सुधारगृहात परतल्या. अन्य चार मुलींचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सुधारगृहातून पळून जाणाऱ्या मुलींच्या संदर्भात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तर पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी महाराज हे युध्दाभ्यास आणि रणनीतीमध्ये अलौकिक क्षमतेचे योद्धे – कादंबरीकार मेधा देशमुख भास्करन

शिवाजी महाराज हे युध्दाभ्यास आणि रणनीतीमध्ये अलौकिक क्षमतेचे योद्धे – कादंबरीकार मेध…