Home क्राईम तीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या बस चालकाच्या घरावर बुलडोझर

तीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या बस चालकाच्या घरावर बुलडोझर

0 second read
0
0
109

no images were found

साडे तीन वर्षाच्या विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या बस चालकाच्या घरावर कारवाई, पोलीस आणि पालिकेने पाडलं घ

भोपाळ :  खासगी शाळेतील नर्सरीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या स्कूल बस चालकाच्या बेकायदेशीर घरावर प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. आरोपीने स्कूल बसमध्येच साडे तीन वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार केला होता. भोपाळमधील या घटनेनंतर सर्वसामान्यांमध्ये प्रचंड संताप आहे. रातीबाद पोलीस ठाण्यात आरोपी चालक आणि एका महिलेविरुद्ध बलात्कार आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपी विवाहित असून त्याला दोन मुली आहेत. त्याने तीन महिन्यांपूर्वीच शाळेत काम सुरू केलं होतं. पीडितेनं एका ग्रुप फोटोवरून आरोपीची ओळख पटवली. आरोपी चालक हा शाहपुरा परिसरातील वसंत कुंज कॉलनीजवळील टाकीसमोर बागेच्या जमिनीवर बांधलेल्या घरात राहतो. हे घर अवैध असल्याचं महानगर पालिकेचं म्हणणं आहे.

मंगळवारी हे प्रकरण उघडकीला आलं होतं. या प्रकरणी पीडितेच्या पालकांनी शाळेत तक्रार केली होती. मात्र, शाळेनं स्थापन केलेल्या अंतर्गत चौकशी समितीनं या चालकाला क्लीन चिट दिली. त्यानंतर पीडितेच्या पालकांनी पोलिसांत धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून या बस चालकाला आणि एका महिला कर्मचाऱ्याला अटक केली. यानंतर बसचालकाच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला असून महसूल विभाग, पोलीस आणि महानगर पालिकेनं संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी महाराज हे युध्दाभ्यास आणि रणनीतीमध्ये अलौकिक क्षमतेचे योद्धे – कादंबरीकार मेधा देशमुख भास्करन

शिवाजी महाराज हे युध्दाभ्यास आणि रणनीतीमध्ये अलौकिक क्षमतेचे योद्धे – कादंबरीकार मेध…