no images were found
निक्की शर्मा म्हणाली, “मला शक्तीच्या भूमिकेत पाहून माझ्या आईचे डोळे पाणावले!”
झी टीव्ही वाहिनीने नुकत्याच प्रसारणास प्रारंभ केलेल्या एका नव्या मालिकेत मन सांधणारी प्रेमाची ताकद दर्शवणारी कथा शिव-शक्ती यांच्या दैवी नात्याच्या आधुनिक स्वरूपात चितारली आहे. ‘स्टुडिओ एलएसडी प्रॉडक्शन्स’ संस्थेची निर्मिती असलेल्या ‘प्यार का पहला अध्याय शिवशक्ती’ मालिकेत शिवच्या भूमिकेत अर्जुन बिजलानी आहे, तर शक्तीची भूमिका निक्की शर्मा साकारणार आहे. भारताची आध्यात्मिक राजधानी असलेल्या वाराणसी शहरात मालिकेचे कथानक घडते. या मालिकेच्या मन गुंतवून टाकणार््या कथानकाने प्रेक्षकांच्या मना पूर्वायुष्यातील काही घटनांनी खचलेल्या शिवला आपल्या प्रेमाच्या ताकदीच्या जोरावर पुन्हा एकदा मनाची उभारी देण्यात शक्तीला यश येते का, ते पाहणे प्रेक्षकांना निश्चितच उत्कंठावर्धक ठरेल.
‘शिवशक्ती’ मालिकेद्वारे निक्की शर्माचे टीव्हीवर पुरागमन झालेले पाहून तिच्या चाहत्यांना तसेच तिची आई संदिपा हिलाही मनापासून आनंद झाला आहे. निक्कीने यात साकारलेल्या शक्तीच्या व्यक्तिरेखेची तिच्या आईने खूप प्रशंसा केली आहे.
निक्की शर्मा म्हणते, “माझ्या आजवरच्या कारकीर्दीत सदैव माझ्या पाठिशी उभी राहणारी माझी सर्वात मोठी चाहती म्हणजे माझी आई. अशी आई मिळाल्याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजते. माझा पहिला प्रसंग टीव्हीवर प्रसारित झाल्यापासून ती माझ्याबरोबर राहिली आहे. माझी आई हीच माझी सर्वात मोठी चाहती असून या मालिकेचा पहिला भाग पाहण्यासाठी ती खूप उत्सुक बनली होती. तो पाहिल्यावर मात्र ती भावूक बनली आणि तिच्या डोळ्यांमध्ये पाणी तरारलं. ती माझ्याबरोबर फक्त सेटवरच असते, असं नव्हे, तर ती दररोज प्रोत्साहन आणि प्रेमाने माझं मन भरून टाकत असते. आता सोशल मीडियावर माझ्या चाहत्यांकडून माझी प्रशंसा करणारे असंख्य संदेश पाहून मी भारावून गेले आहे. त्यांच्या या उदंड पाठिंब्याबद्दल मी त्यांची कृतज्ञ राहीन. या प्रतिसादामुळेच मला दर वेळी अधिक चांगली कामगिरी करण्याची उमेद आणि प्रेरणा मिळते. माझी आई आणि माझ्या चाहत्यांच्या पाठिंब्याच्या जोरावर मी आता काहीही करण्यास सिध्द झाले असून शक्तीच्या भूमिकेत मी माझं सर्वस्व पणाला लावीन!”