no images were found
चर्मकार समाजातील लाभार्थ्यांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी संपर्क साधावा
कोल्हापूर : अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाच्या (चांभार, ढोर, होलार, मोची इत्यादी यांचा) आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी विविध कर्ज योजना राबविल्या जातात. महामंडळामार्फत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता राज्य व केंद्र शासनाच्या (एन.एस.एफ.डी.सी.) योजना राबविण्यात येत असून ४ हजार ८०० लाभार्थ्यांना कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
१) एन.एस.एफ.डी.सी. नवी दिल्ली यांच्या मुदती कर्ज योजने अंतर्गत स्मॉल बिझनेस १ लाख रुपये, १ लाख ५० हजार रुपये व २ लाख रुपये, तर चर्मोद्योग २ लाख रुपये, लघुऋण वित्त योजना व महिला समृध्दी योजनेसाठी प्रत्येकी ५० हजार रुपये तसेच या योजनांसाठी मागील प्रलंबित नस्तीसाठी २२.२१ कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे.
२) सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात एन.एस.एफ.डी.सी. यांच्या मुदती कर्ज योजने अंतर्गत स्मॉल बिझनेस ५ लाख रुपये, लघुऋण वित्त योजना व महिला समृध्दी योजना प्रत्येकी १.४० लाख रुपये तसेच नवीन महिला अधिकारीता योजनेसाठी ५ लाख रुपये मंजूर झाले आहेत.
३) एन.एस.एफ.डी.सी. यांच्या शैक्षणिक कर्ज योजनेमध्ये वाढ झाली असून भारतामध्ये २० लाख रुपये व विदेशामध्ये ३० लाख रुपयापर्यंत कर्ज मंजूर करण्यात येईल.
चर्मकार समाजातील लाभार्थ्यांनी नजीकच्या महामंडळाच्या जिल्हा कार्यालयास भेट देवून विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.