“मुंबई लोकल” १ ऑगस्टपासून संपूर्ण महाराष्ट्रात मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलच्या प्रवासात झालेल्या नजरानजरेपासून आयुष्य बदलणाऱ्या घटनेपर्यंतचा रंजक प्रवास “मुंबई लोकल” या चित्रपटातून उलगडणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सुप्रसिद्ध अभिनेता, निर्माता स्वप्निल जोशी यांच्या विशेष उपस्थितीत करण्यात आला.”मुंबई लोकल” या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन अभिजीत यांनी केलं आहे. बिग ब्रेन प्रॉडक्शन्स, आनंदी एंटरटेनमेंट आणि स्प्लेंडिड प्रॉडक्शन्सने या चित्रपटाची निर्मिती केली …