Home मनोरंजन “टेलिव्हिजनने मला शिकवले की लांबलचक दृश्यातही आपल्या व्यक्तिरेखेचा तोल कसा सांभाळायचा आणि पात्राच्या भावनांशी कसे संलग्न राहायचे”: दीक्षा जोशी 

“टेलिव्हिजनने मला शिकवले की लांबलचक दृश्यातही आपल्या व्यक्तिरेखेचा तोल कसा सांभाळायचा आणि पात्राच्या भावनांशी कसे संलग्न राहायचे”: दीक्षा जोशी 

9 second read
0
0
19

no images were found

 “टेलिव्हिजनने मला शिकवले की लांबलचक दृश्यातही आपल्या व्यक्तिरेखेचा तोल कसा सांभाळायचा आणि पात्राच्या भावनांशी कसे संलग्न राहायचे”: दीक्षा जोशी 

       गुजराती चित्रपटांत आपले स्थान निर्माण केल्यावर आणि ‘जयेशभाई जोरदार’, ‘कौशलजीज vs कौशल’ आणि ‘धडक 2’ सारख्या बॉलीवूड चित्रपटांमध्ये आपली उपस्थिती नोंदवल्यानंतर आता दीक्षा जोशी छोट्या पडद्यावर सोनी सबवरील ‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेत दीप्तीच्या भूमिकेत प्रेक्षकांचे मन जिंकत आहे. टेलिव्हिजनवर पदार्पण करत, दीक्षा या मालिकेतील सात वर्षांच्या लीपनंतर त्यात दाखल झाली आहे आणि कथानकाला एक ताजेपणा बहाल करत आहे.

      टेलिव्हिजनवर काम करण्याचा आपला अनुभव शेअर करताना दीक्षाने सांगितले हे माध्यम चित्रपटाच्या तुलनेत कसे अगदी वेगळे आहे. तासन् तास शूटिंग करण्यापासून ते भावनिक दृश्ये करताना त्यातील तांत्रिक बाजूंमध्ये नेमकेपणा आणण्यापर्यंत टेलिव्हिजनने आपल्याला आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर काढले असे तिचे मत आहे. या मालिकेच्या सेटवर आसपास कसलेले कलाकार असल्याने तिला खूप शिकता येत आहे. सातत्य, शिस्त आणि दररोज प्रभावी परफॉर्मन्स देण्यासाठी ज्या गतीची आवश्यकता असते, त्याविषयी तिला शिकायला मिळत आहे. ती सांगते की हे प्रारंभिक दिवस तिला समृद्ध करणारे आणि विनम्रता देणारे होते. ज्यामुळे तिच्या कलेला नवीन पैलू मिळाले आहेत.

       टेलिव्हिजन हे माध्यम चित्रपटापेक्षा कसे वेगळे आहे, याविषयी दीक्षा जोशी म्हणते, “मी या आधी चित्रपट, नाटक, छोटे फॉरमॅट आणि जाहिरातीत काम केले आहे. पण टेलिव्हिजन माझ्यासाठी अगदीच नवीन आहे. टेलिव्हिजनमध्ये वेग खूप जास्त असतो. त्यामुळे तुम्हाला भावनिक दृष्ट्या तयार आणि तांत्रिक दृष्ट्या जाणकार असावे लागते, तसेच दररोज सातत्य सांभाळावे लागते. चित्रपटात असतो, तसा दृश्यात सहज होण्यासाठीचा एक्स्ट्रा टाइम येथे नसतो. टेलिव्हिजनने मला शिकवले की लांबलचक दृश्यातही आपल्या व्यक्तिरेखेचा तोल कसा सांभाळायचा, सातत्य कसे सांभाळायचे आणि झटपट बदल होत असतानाही पात्राच्या भावनांशी कसे संलग्न राहायचे. मला वाटते, या बाबतीत मला अधिक मेहनत घेण्याची गरज होती आणि टीव्ही माझा पाया मजबूत करण्यात मला मदत करत आहे. पुन्हा चित्रपटांकडे धाव घेण्यापेक्षा माझी कला आणखी निखारण्याची माझी इच्छा आहे. सेटवरचा प्रत्येक दिवस काही तरी शिकवणारा आहे. खास करून अशा अनुभवी कलाकारांसोबत काम करताना खूप काही शिकता येते. हा अनुभव मला एक अभिनेता म्हणून वेगळाच आत्मविश्वास देणारा आहे.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन
Comments are closed.

Check Also

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच चेहरा प्…