
no images were found
संगीत व नाटयशास्त्र अधिविभागयांच्या वतीने नाटय कार्यशाळेचे आयोजन
संगीत व नाटयशास्त्र अधिविभाग] शिवाजी विद्यापीठ] कोल्हापूर यांच्या वतीने दिनांक २६ व २७ डिसेंबर २०२३ रोजी नाटय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या परफाWर्मिंग आर्टस् विभागाचे वरीष्ठ सहाय्यक प्राध्यापक डॉ. सतीश पावडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व
अभ्यासक, जिज्ञासूंना नाटयनिर्मिती आणि सादरीकरणाची प्रक्रिया तसेच भरताच्या नाटयशास्त्रातील प्रेक्षण व्यवस्था या विषयी मार्गदर्शन केले.
या दोन दिवसीय कार्यशाळेमध्ये पहिल्या दिवशी नाटय निवडताना त्याचे कथानक, पात्र, विषय, आशय, संरचना, घटनेचा काळ इत्यादी आवश्यक गोष्टींवर चर्चा करण्यात
आली. त्याच बरोबर दुस-या दिवशी भरताचे नाटयशास्त्र आणि त्याचे आजच्या काळात देखिल लागणारे संदर्भ यांची माहीती देण्यात आली. या कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ. निखिल भगत यांनाी केले तर स्वागत डॉ. विनोद ठाकूरदेसाई यांनी केले. पाहुण्यांचा परिचय श्री. युवराज केळुसकर यांनी केला. या कार्यशाळेसाठी डॉ. संजय तोडकर डॉ. अंजली निगवेकर आणि विभागातील शिक्षक, विद्यार्थी व रसिक उपस्थित होते.