Home राजकीय लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेचे राज्यभर मेळावे -राजेश क्षीरसागर

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेचे राज्यभर मेळावे -राजेश क्षीरसागर

2 second read
0
0
34

no images were found

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेचे राज्यभर मेळावे -राजेश क्षीरसागर

मुंबई  : शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्यात शिवसेनेची घोडदौड सुरु आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेने कंबर कसली असून, लोकसभा निवडणुकीचे पहिले पाऊल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत आज जाहीर करण्यात आले. शिवसंकल्प अभियानाद्वारे शिवसेना दि.६ जानेवारी २०२४ रोजी पासून राज्यभरात १६ लोकसभा मतदारसंघात मेळावे घेणार असून, दि.२९ जानेवारी २०२४ रोजी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात आणि दि.३० जानेवारी २०२४ रोजी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मा.मुख्यमंत्री आणि इतर मंत्री महोदयांच्या उपस्थितीत मेळावा पार पडणार असल्याची माहिती, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली वर्षा बंगला, मुंबई येथे शिवसेनेचे मंत्री, वरिष्ठ पदाधिकारी यांची बैठक पार पडली. यासह सदर बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे राज्यभरातील जिल्हाप्रमुख, शहरप्रमुख आदी शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. वर्षा बंगला येथील बैठकीस राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हेही उपस्थित होते.

यावेळी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, लोकसभा निवडणूकीच्या तयारीला लागा. पहिले पाऊल आज जाहीर होत असलेले शिवसंकल्प अभियान आहे. कुठली जागा कुठली पार्टी लढवणार, उमेदवार कोण, सीट कोणाला सोडणार यासारख्या अफवा समोरुन परसवल्या जात आहेत. यापुढेही पसरवल्या जातील त्याकडे आजिबात लक्ष देवू नका. आपण आपल्या सर्व जागा ताकदीने लढवूया, जिंकूया. आपली महायुती विजयी करुया. वातावरण चांगले आहे, राज्यात झपाटयाने विकास कामे होत आहेत. केंद्राचे मजबूत पाठबळ आपल्या पाठिशी आहे. केलेल्या कामावर आपण मते मागूया. आताचा माझा राज्यभर शिवसंकल्प अभियान दौरा जाहीर करत आहोत. त्यातील बारीक सारीक तपशील तुम्हाला पुढे देण्यात येईल, त्याचे काटेकोरपणे पालन करा. प्रत्येकाने गंभीरपणे काम करुन हा दौरा यशस्वी करुया, राज्य भगव्या वादळाने ढवळून काढूया. लवकरच महायुतीच्या ही भव्य सभा पुढील टप्यात होणार आहेत. आताचा दौरा काटेकोरपणे आखला आहे. वेळ कमी आहे. सभेला शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, गट प्रमुख ते शिवसैनिक, महिला आघाडी, युवा सेना, संलग्न संघटना सभासद, शिवदूत उपस्थित राहणे अपेक्षित आहे. त्याप्रमाणे लोकसभा मतदारसंघाप्रमाणे अभियान यशस्वी करा, अशा सूचना दिल्या.

प्रती,

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

धर्मादाय रुग्णालय आपल्या दारी

धर्मादाय रुग्णालय आपल्या दारी कोल्हापूर, : महाराष्ट्र शासनाच्या 100 दिवस कृती आराखडा कार्य…