
no images were found
अक्षय कुमारला मिळाले एक गोड सर्प्राइज
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचा स्वतःचा फॉरमॅट असलेल्या सुपरस्टार सिंगर 2 या लहान मुलांच्या गायन रियालिटी शोमध्ये सहभागी असलेले छोटे स्पर्धक दर आठवड्याला एकापेक्षा एक सरस परफॉर्म करून परीक्षक आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत आहेत. या शोचा आगामी भाग म्हणजे संगीताची एक सुरेल पर्वणी असणार आहे. या शनिवारी रक्षाबंधन विशेष भागात संगीताची जादू, हृदयस्पर्शी क्षण अनुभवताना भाऊ-बहिणीच्या गोड नात्याचा सोहळा देखील साजरा होणार आहे. या विशेष भागात रक्षाबंधन या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी या चित्रपटाचा दिग्दर्शक आनंद एल राय आणि बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार पडद्यावरील त्याच्या बहीणी- सादिया खतीब, सहजमीन कौर, दीपिका खन्ना आणि स्मृती श्रीकांत यांच्यासोबत उपस्थित असणार आहे.या भागाच्या सुरेल जल्लोषात दिग्दर्शक आनंद एल राय राखी पौर्णिमेनिमित्त अक्षय कुमारला एक खास सर्प्राइज देणार आहे, जे पाहून अक्षय कुमार भावुक न झाला तरच नवल!