
no images were found
कौन बनेगा करोडपतीचे 14वे सत्र सुरू होणार
भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वात जास्त चाललेल्या ज्ञान-आधारित गेम शो, कौन बनेगा करोडपतीचे नवीन सत्र लवकरच सुरू होत आहे. या शोचे 14वे सत्र केवळ हॉटसीटपर्यंत पोहोचणार्या स्पर्धकांसाठीच नाही, तर प्रेक्षकांसाठीही अधिक आकर्षक आणि समाधान देणारे असणार आहे. स्टुडिओ नेक्स्ट द्वारा निर्मित या शोचा शुभारंभ रविवारी 7 ऑगस्ट रोजी होणार असून दर सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता हा शो प्रसारित करण्यात येईल.
भारताच्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षाचे औचित्य साधून हा शो ‘आझादी के गर्व का महापर्व’ या धमाकेदार इव्हेंटच्या रूपात सुरू होणार आहे. श्री. अमिताभ बच्चन यांचे सूत्रसंचालन लाभलेल्या या विशेष भागात कारगिल युद्धातील वीर मेजर डी. पी. सिंह, सेना पदक विजेती कर्नल मिताली मधुमिता तसेच जगप्रसिद्ध भारतीय खेळाडू पद्मविभूषण एम सी मेरी कॉम आणि पद्मश्री सुनील छेत्री तसेच पद्मभूषण अभिनेता आमीर खान हे मान्यवर उपस्थित असणार आहेत.