
no images were found
बचत आणि संरक्षणासाठी आश्चर्यकारक उत्पादन – ‘जुडवा-जी’
पुणे: सल्फर मिल्स लिमिटेडने नुकतेच पेटंट केलेले कीटकनाशक जुडवा जी महाराष्ट्रात प्रदर्शित केले. यावेळी श्री बिमल शाह, (सल्फर मिल्स लिमिटेडचे-व्यवस्थापकीय संचालक) पत्रकारांशी संबोधुन बोलले की, जुडवा जी हे ड्राय कॅप तंत्रज्ञानावर आधारित जगातील पहिले कीटकनाशक आहे, ज्यामध्ये पॉलिमर कॅप्सूलमध्ये सर्व सक्रिय रसायने साठवली जातात. ही रसायने योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात पिकांच्या पानांपर्यंत पोचतात, त्यामुळे भाताचे पिक कीटकांपासून सुरक्षित राहू शकतात. अशाप्रकारे जुडवा जी खोड किडा आणि सुरवंट (Caterpillar) यांसारख्या कीटकांपासून पिकांचे संरक्षण करतो.
श्री बिमल शाह यानी सांगितले की जुडवा जी ही एक अनोखी संकल्पना आहे ज्यामध्ये कंपनीचे पेटंट ड्राय कॅप तंत्रज्ञान दोन वेगवेगळ्या कृषी रसायनांची एकाचवेळी फवारणी करण्यास शक्य करते. त्याच्या वापरामुळे बाजारात उपलब्ध असलेल्या अधिक विषारी द्रव फॉर्म्युलेशनचा वापर कमी होऊ शकतो, जे अधिक हानिकारक आहेत.