no images were found
नेहा एस. के. ने स्कूटरवर स्वार होत उत्स्फूर्तपणे केली बाइक राईड
प्रसिद्ध अभिनेत्री नेहा एस. के. सोनी सबवरील ‘इत्ती सी खुशी’ या लोकप्रिय मालिकेत चुणचुणीत आणि बेधडक हेतलची भूमिका करत आहे. आपल्या उत्साही आणि क्रिएटिव्ह स्वभावाने ती केवळ पडद्यावरच नाही, तर पडद्याच्या मागे देखील लोकांचे मन जिंकून घेत आहे. ती प्रदीर्घ शूटिंगच्या वेळेत देखील मालिकेच्या कलाकारांसाठी सेटवरील वातावरण प्रसन्न, हलके-फुलके ठेवते.
अलीकडेच, चित्रीकरणातील विश्रांती दरम्यान, नेहाला सेटवर पार्क केलेली एक स्कूटर दिसली, बहुधा कोण्या डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हची असावी. अत्यंत उत्स्फूर्तपणे, नेहा त्या स्कूटरवर स्वार झाली. नेहाने थोडी प्रॅक्टिस केली, टीमकडून थोड्या टिप्स घेतल्या आणि एका झटक्यात आत्मविश्वासाने राईड करणे तिला साधले. हा सगळा प्रकार खूप गंमतीदार होता. तिने ज्या सहजपणे हे साधले ते पाहून सर्व कलाकार आणि क्रू सदस्यांना नवलच वाटले. पण गंमत इथेच संपली नाही. मालिकेत बनीची भूमिका करणारा छोटा सैयांश शैलेश गुप्ता देखील तिला सामील झाला आणि मग दोघांनी मिळून एक मस्त राईड केली, त्यांना पाहताना सेटवरच्या लोकांचे चेहरे फुलले. पटकथेत नसलेल्या या क्षणात नेहाची उन्मुक्त ऊर्जा, पडद्यावर आणि पडद्याच्या मागेही आपल्या सभोवतालच्या लोकांना आपलेसे करण्याची आणि वातावरण सकारात्मक करण्याची क्षमता दिसली.
‘इत्ती सी खुशी’ च्या सेट्सवरचा हा पडद्यामागचा इन्स्टाग्राम व्हिडिओ पाहताना चाहत्यांना नेहाच्या या उत्स्फूर्त कृतीची झलक बघायला मिळाली आणि शूटिंगच्या गडबडीत देखील सेटवरच्या कलाकारांना प्रसन्नता देणारी ही हलकी-फुलकी गंमत करणारी नेहा दिसली. ही स्कूटर राईड म्हणजे स्टार मोमेंट होता, पण त्याचवेळी, सेटवर काम करणाऱ्या लोकांसाठी आणि खास करून लहान मुलांसाठी घरच्यासारखे खेळकर वातावरण निर्माण करण्याची नेहाची वृत्तीही त्यातून झळकली.हेतलची भूमिका करणारी नेहा एस. के. म्हणते, “‘इत्ती सी खुशी’ मालिकेत काम करण्याचा अनुभव खूप छान आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे सेटवर खूप लहान मुले असतात. ती बाइक राईड अगदी उत्स्फूर्त होती. मला स्कूटर दिसली, कुणी तरी मला सहज म्हणाले, ‘तू चालवून का बघत नाहीस?’ आणि काही समजण्यापूर्वी मी त्या स्कूटरवर स्वार देखील झाले. काही क्षण मी प्रॅक्टिस केली, टीमकडून थोडी मदत घेतली आणि बस.. जमले मला. आम्ही त्यावर विनोदही केला की ‘हे म्हणजे वन-टेक शॉट सारखे झाले.”