no images were found
सत्तेचा खेळ, सूडाची आग आणि रक्तरंजित वास्तव उघड करणारा ‘सुड शकारंभ’ चित्रपटाचा थरकाप उडवणारा ट्रेलर प्रदर्शित !!
कोल्हापूर(प्रतिनिधी):- गावकुसाबाहेर पेटलेला सत्तेचा संघर्ष, अहंकारातून उफाळलेला सूड आणि नात्यांची राख करणारा विश्वासघात या सगळ्यांचा अंगावर काटा आणणारा अनुभव देणाऱ्या मराठी अॅक्शन-ड्रामा-थ्रिलर ‘सुड शकारंभ’ सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरने रिलीज होताच प्रेक्षकांच्या मनात उत्सुकतेची खळबळ उडवली आहे. हा चित्रपट १६ जानेवारी २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपटगृहात दाखल होणार आहे.
शांततेचा मुखवटा पांघरलेलं गाव आणि त्यामागे दडलेली हिंसा ट्रेलरमधून हळूहळू उघड होत जाते. सत्ता अबाधित ठेवण्यासाठी सुरू असलेल्या खेळी, सूडाच्या ज्वाळांमध्ये होरपळणारी माणसं, धारदार संवाद आणि वेगवान कट्स हे सगळं मिळून ट्रेलरला प्रचंड थरारक बनवतं. ग्रामीण राजकारणाचा काळा चेहरा आणि मानवी स्वभावातील क्रूर बदल ट्रेलर ठसठशीत दाखवतो.
शोएब खतीब यांनी कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळत एक तीव्र, वास्तवदर्शी आणि सिनेमॅटिक अनुभव उभा केला आहे. ज्योती पाटील प्रस्तुत आणि राजनील फिल्म प्रोडक्शन निर्मित, दत्तसंग्राम वासमकर – सहयोगी निर्माता यांचे भक्कम पाठबळ लाभले आहे.
चित्रपटात मनीषा मोरे, आयुष उलघडे, ओम पानस्कर, सुनील सूर्यवंशी, ऐश्वर्या मल्लिकार्जुन, सोनाली घाडगे, सलोनी लोखंडे, राज साने आणि मारुती केंगार यांच्या प्रभावी भूमिका पाहायला मिळणार आहेत. विकी वाघ यांच्या संगीत आणि पार्श्वसंगीताने अधिक तीव्रता मिळाली सिनेमाला असून, मनीष राजगिरे, हर्षवर्धन वावरे, विकी वाघ आणि मयुरी जाधव यांच्या आवाजाने गाणी भावस्पर्शी झाली आहेत. पॅनोरमा म्युझिकअंतर्गत सिनेमाचं संगीत प्रदर्शित होत आहे.
ग्रामीण राजकारणाचे वास्तव टिपण्यासाठी छायाचित्रण रोहण पिंगळ आणि अमेय तानवडे यांनी केले असून, संकलन रोहित रुकडे यांचे आहे. कला दिग्दर्शन सोनाली घाडगे, तर प्रॉडक्शन मॅनेजमेंटची जबाबदारी श्रीराज पाटील -कार्यकारी निर्माता आणि जीत शहा, दिगंबर शिंदे आणि ओंकार गूळीक यांनी सांभाळली आहे. पब्लिसिटी डिझाईन स्कारलेट स्टुडिओज्, पी.आर. प्रज्ञा शेट्टी, सोशल मीडिया अश्मिकी टिळेकर तसेच सीईओ राजेश मेनन आणि सनशाईन स्टुडिओझ यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
जिथे सत्ता बोलते… तिथे माणूस बदलतो. ‘सुड शकारंभ’ हा केवळ सूडाची कथा नसून, सत्तेच्या खेळात माणूस कसा बदलतो आणि गावाच्या मातीमध्ये कशी रक्तरंजित ज्वाला पेटते याचा एक प्रवास आहे. १६ जानेवारी २०२६ पासून जवळच्या चित्रपटगृहात हा अनुभव नक्की घ्या.