Home मनोरंजन ‘गणेश कार्तिकेय’ मालिकेतील अष्टविनायक यात्रा मोरगावपासून सुरू 

‘गणेश कार्तिकेय’ मालिकेतील अष्टविनायक यात्रा मोरगावपासून सुरू 

5 second read
0
0
26

no images were found

गणेश कार्तिकेय मालिकेतील अष्टविनायक यात्रा मोरगावपासून सुरू 

 सोनी सबवरील ‘गाथा शिव परिवार की – गणेश कार्तिकेय’ या पौराणिक मालिकेत अष्टविनायक आस्था यात्रेच्या रुपातून गणेशाचा (निर्णय समाधिया) दिव्य प्रवास उलगडत आहे. आध्यात्मिक भव्यता आणि हृदयस्पर्शी कौटुंबिक क्षण यांची सांगड घालत ही मालिका हा शोध घेत आहे की कशाप्रकारे हा दिव्य परिवार प्रेम, जबाबदारी, संघर्ष आणि क्षमाशीलता या मूल्यांचा अनुभव घेत आहे.

आगामी भागांमध्ये, गणेशाचा रिद्धी-सिद्धीसोबतचा भव्य विवाह सोहळा पार पडल्यानंतर, शुक्राचार्य (विष्णू शर्मा) आणि सिंधुरासुर (निर्भय वाधवा) गणेशाविरुद्ध आणखी एक कट रचतात आणि वारंवार चेतावणी मिळूनही अधर्माच्या मार्गावर चालत राहतात. अष्टविनायक यात्रा सुरू झाल्यानंतर पहिला मुक्काम मोरगावला आहे, जेथे सिंधुरासुर आपला पहिला दुर्गुण- अहंकार प्रकट करतो. त्याच्या परिणामामुळे गावकरी गणेशाची पूजा-अर्चा करणे सोडून देतात. सर्वत्र गोंधळ माजतो आणि जगत नावाच्या तरुणाच्या जीवनात एक दिव्य चमत्कार होतो. हिंसा गावाचा ताबा घेऊ लागते तेव्हा गणेश आधी एका लहान मुलाच्या रूपात आणि मग आपल्या अणिमा रूपात प्रकट होतात आणि मोरगावला ग्रासणाऱ्या अहंकाराचा संहार करतात. श्रद्धा पुन्हा स्थापित होते आणि गणेश देखील स्वतःला याच गावात स्थापित करतात आणि अष्टविनायक प्रवासाची विजयी सुरुवात करतात.

‘गणेश कार्तिकेय’ मालिकेत गणेशाची भूमिका करणारा निर्णय समाधिया म्हणतो, “मोरगावपर्यंतचा गणेशाचा प्रवास म्हणजे केवळ कुणाशी तरी युद्ध करण्याचा प्रवास नाही, तर सर्वांना आपला अहंकार सोडून देण्यासाठी दिलेला धडा आहे. या कथेमधून हे समजते की, थोडीशी श्रद्धा देखील विराट अहंकारावर मात करू शकते. लोकांमध्ये पुन्हा श्रद्धा आणून त्यांना विनम्र राहण्यास शिकवणारा गणपती साकारताना मला खूप छान वाटते.”

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन
Comments are closed.

Check Also

बोगस उपचारांची पडताळणी करुन कारवाई करा – पोलीस उपधीक्षक तानाजी सावंत

बोगस उपचारांची पडताळणी करुन कारवाई करा – पोलीस उपधीक्षक तानाजी सावंत कोल्हापूर, : सा…