no images were found
सेटवरच्या आठवणींपासून ते लहानपणीच्या गोष्टींपर्यंत: सोनी सबवरील कलाकार शेतकरी दिनाबाबत आपले विचार मांडत आहेत.
भारत देशातील लोकजीवन हे ऋतूचक्राशी आणि मातीशी जोडलेले आहे. त्यामुळे शेतकरी हाच खरा आपल्या समृद्धीचा आणि अन्न सुरक्षेचा शिल्पकार आहे. तोच अन्नदाता आहे, जो अर्थव्यवस्थेचा कणा असून आपल्या हाताने देशाचे पोषण करतो. राष्ट्रीय शेतकरी दिन त्यांच्या लवचिकतेला, सतत आव्हानांशी झुंजणाऱ्या त्यांच्या वृत्तीला आणि अढळ निष्ठा आणि परिश्रमाला वाहिलेली एक भावपूर्ण आदरांजली आहे. भारताच्या प्रगतीत सिंहाचा वाटा उचलणाऱ्या शेतकऱ्यांच्या भूमिकेची दखल घेण्याचे स्मरण देणारा हा दिवस आहे. या वर्षी सोनी सबवरील कलाकार शेतकरी समुदायाविषयीची कृतज्ञता व्यक्त करत आहेत आणि सांगत आहेत, कशाप्रकारे त्यांचे प्रवास आणि ते सादर करत असलेल्या कहाण्या या मातीशी आणि मातीत काम करणाऱ्या शेतकाऱ्यांशी निगडीत आहेत.
‘इत्ती सी खुशी’ मालिकेत अन्विता ही व्यक्तिरेखा साकारणारी सुंबुल तौकीर खान म्हणते, “राष्ट्रीय शेतकरी दिन आपल्याला हे स्मरण देतो की, आपले जीवन शेतकऱ्यांच्या कठोर परिश्रमाशी कसे खोलवर निगडित आहे. त्यांची निष्ठा आपल्या देशाचे पोषण करते आणि देशाची भरभराट करते. या दिवशी, मी प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या अविरत प्रयत्नांबद्दल आणि त्याच्या लवचिकतेबद्दल सलामी देते. ते खरोखरच आपल्या देशाचा आधार आहेत.”
‘इत्ती सी खुशी’ मालिकेत विराटची भूमिका करणारा रजत वर्मा म्हणतो, “मला आठवते आहे, लहानपणी मी माझ्या आजी-आजोबांच्या गावी जायचो. त्यावेळी तेथील शेतकऱ्यांचा दिवस सूर्योदय होण्याअगोदरच सुरू झालेला असायचा. लहान असतानाही मला त्यांची ती शिस्त आणि मूक ताकद चकित करायची. राष्ट्रीय शेतकरी दिनी, ती आठवण ताजी झाली आणि त्यांच्या कठोर परिश्रमाचे आपल्यावर किती ऋण आहे हे जाणवले. त्यांची अढळ निष्ठा आणि परिश्रम आपला समस्त देश चालवतात आणि त्याबद्दल मी मनापासून त्यांचा ऋणी आहे.”
‘इत्ती सी खुशी’ मालिकेत संजय भोसलेची भूमिका करत असलेला ऋषी सक्सेना म्हणतो, “मी जेव्हा जेव्हा शूटिंगच्या निमित्ताने खेड्यांमध्ये जातो तेव्हा कोणत्याही ऋतूत शेतात अथक परिश्रम करणाऱ्या शेतकाऱ्यांकडे पाहून अचंबित होतो. मला त्यांची बांधिलकी आणि धैर्य अत्यंत प्रेरणादायक वाटते. राष्ट्रीय शेतकरी दिनी, मी त्या भावनेला सलाम करतो- त्यांची दृढता आणि चिकाटी समस्त देशाचे पोषण करते. ते खरोखर या देशाचा आत्मा आहेत.”
‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेत प्रोफेसर राजवीर शास्त्री ही व्यक्तिरेखा साकारणारा गौरव चोप्रा म्हणतो, “शेतकरी निसर्गाच्या कठोर परीक्षांना चिकाटीने तोंड देत असतात, जसे आपण एखादे दृश्य अचूक उतरावे यासाठी तासन् तास मेहनत घेतो. पण त्यांच्यावर कॅमेरा, स्पॉटलाइट किंवा समोर दाद देणारा प्रेक्षक नसतो. मात्र त्यांच्या परिश्रमाचे फळ देशाच्या घराघरातील लोक चाखतात. त्यांच्या मेहनतीमुळे देशभरातील प्रत्येक घराची स्थिरता सुनिश्चित होते. राष्ट्रीय शेतकरी दिनी, आपल्या वर्तमान आणि भविष्यासाठी ते करत असलेल्या परिश्रमापुढे मी नतमस्तक होतो!”