no images were found
कॅनरा रोबेको ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड (‘कॅनरा रोबेको एएमसी’) तर्फे ‘निवेश बस यात्रा’
कोल्हापूर, : कॅनरा रोबेको ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड ने महाराष्ट्र व गोव्यामध्ये ‘निवेश बस यात्रा’ सुरू केली आहे. ज्याअंतर्गत म्युच्युअल फंड गुंतवणूकीबाबत जागरूकतेचा प्रसार करण्यात येईल आणि राज्यभरातील गुंतवणूकदारांना शिक्षित करण्यात येईल.
या उपक्रमाचा म्युच्युअल फंड गुंतवणूक सोपी करण्याचा आणि राज्यांमध्ये आर्थिक शिक्षण देण्याचा मनसुबा आहे. एक बस महाराष्ट्रातील पुण्यापासून प्रवासाला सुरूवात करेल, ज्यानंतर नाशिक, संभाजीनगर, जालना, अकोला व नागपूर यांसह प्रमुख ठिकाणांपर्यंत प्रवास करत शहरांमधील निवासींमध्ये जागरूकतेचा प्रसार करेल. दुसरी बस कोल्हापूरमधून प्रवासाला सुरूवात करेल, ज्यानंतर रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी येथे प्रवास करेल आणि गोव्यामध्ये या उपक्रमाचे समापन होईल.
”आजच्या आर्थिक क्षेत्रात ज्ञान माहिती इतकेच महत्त्वाचे आहे. माहितीपूर्ण गुंतवणूकदार स्वत:साठी उत्तम निर्णय घेण्यासोबत व्यापक आर्थिक परिसंस्था प्रबळ देखील करतो. आम्ही गुंतवणूकीबाबत माहिती सहजसाध्य व कृतीशील करण्याप्रती कटिबद्ध आहोत,” असे कॅनरा रोबेको एएमसीचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) व मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) रजनीश नरूला म्हणाले. ”निवेश बस यात्राचा प्रत्यक्ष समुदायांना आर्थिक शिक्षण देण्याचा मनसुबा आहे. केरळ, पंजाब, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, कर्नाटक, राजस्थान, तेलंगणा, आंध्रप्रदेश, ओडिशा व आसाम अशा राज्यांपर्यंत पोहोचण्यासह आम्ही आता हा उपक्रम महाराष्ट्र व गोव्यामध्ये आणत आहोत, जेथे विविध शहरांमधील निवासींशी संलग्न होऊन त्यांना गुंतवणूक सुलभ करण्यास, मिथकांना दूर करण्यास आणि दीर्घकालीन आर्थिक नियोजन करण्यास मदत करू.”
निवेश बस यात्रा प्रमुख सामुदायिक ठिकाणांना भेट देईल, जेथे निवासींशी कनेक्ट होईल आणि त्यांना व्यावहारिक ज्ञान देईल. साधे प्रात्यक्षिके व डिजिटल टूल्सच्या माध्यमातून या उपक्रमाचा म्युच्युअल फंड्सबाबत गैरसमजांना दूर करण्याचा आणि नियमित, दीर्घकाळापर्यंत गुंतवणूक करण्याचे फायदे स्पष्ट करण्याचा मनसुबा आहे.
”आम्ही आर्थिक ज्ञान व्यावहारिक व सहजसाध्य करत गुंतवणूकदारांना सक्षम करण्याप्रती कटिबद्ध आहोत. निवेश बस यात्रा या कटिबद्धतेला प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने आमची पद्धत आहे, जेथे प्रत्यक्ष समुदायांसोबत संलग्न होणार आहोत, तसेच गुंतवणूकदारांना भेटून त्यांच्या शंकांचे निरसन करणार आहोत,” असे कॅनरा रोबेको एएमसीच्या सेल्स अँड मार्केटिंगचे प्रमुख गौरव गोयल म्हणाले. ”या उपक्रमाच्या माध्यमातून आमचा म्युच्युअल फंड गुंतवणूक सोपी करण्याचा, कृतीशील मार्गदर्शन देण्याचा आणि सामान्य गैरसमजांना दूर करण्याचा मनसुबा आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल आणि ते मालमत्ता निर्मितीसाठी दीर्घकालीन दृष्टिकोनाचा अवलंब करतील.”
या उपक्रमामधून गुंतणूकदारांमध्ये जागरूकता निर्माण करण्यावर, तसेच उदयोन्मुख व वंचित प्रांतांमध्ये आर्थिक सर्वसमावेशकतेला चालना देण्यावर कॅनरा रोबेको एएमसीचा सततचा फोकस दिसून येतो.